आयुक्त तुकाराम मुढेंची कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे याच्या आदेशाने आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम यांच्या मार्फत सीबीडी बेलापूर येथील सुखदा रुग्णालय व ऐरोली येथील माऊली रुग्णालय यांच्यावर  बॉम्बे नìसग होम रजिस्ट्रेशन (सुधारीत) कायदा २००५  नुसार वेळोवेळी संधी देवूनही कागदपत्रे व त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे तर नेरूळ येथील सिध्दीविनायक रुग्णालय एमटीपी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे रुग्णालयांची नोंदणी रद्द केली आहे.

नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सीबीडी बेलापूर येथील  डॉ. शशिराज शेट्टी यांचे सुखदा स्पेशालिटी व ऐरोली सेक्टर २ येथील डॉ. अलका शेळके यांचे माऊली रुग्णालय ३१ मार्च २०१६  पर्यंत नोंदणीकृत होते परंतू त्यांना पुर्ननोंदणीसाठी वेळोवेळी संधी देवूनही त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे त्यांची रुग्णालयीन नोंदणी रद्द करून एक महिन्यात रुग्णालय चालविणे बंद करणेबाबत २८ नोव्हेंबर रोजी आदेश देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे नेरुळ येथील सेक्टर १८-ए येथील  सिध्दीविनायक रुग्णालय  यांचे रुग्णालय बॉम्बे नìसग होम रजिस्ट्रेशन (सुधारित) कायदा २००५ नुसार नोंदणीकृत होते परंतू त्यांनी एमटीपी  (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रिग्नन्शी अ‍ॅक्ट) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करुन रुग्णालय चालविणे बंद करण्याचे आदेश दिले आहे.

 

बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई सुरूच

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली असली तरी स्थानिक नेत्यांकडून विरोध सुरू झाला आहे. मात्र न्यायालयाचे स्पष्ट आदेश असल्याने सर्व बेकायदेशीर स्थळांवर कारवाई होईल, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरात ३५१ बेकायदेशीर धार्मिक स्थळे आहेत. या स्थळांवर पालिकेकडून कारवाई सुरू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी या कारवाईला विरोधही होत आहे. पालिका निवडणुका अगदी तोंडावर असल्याने स्थानिक नेतेही लोकांसोबत काही ठिकाणी कारवाईत अडथळे आणत आहेत. मात्र कारवाई अटळ असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.