boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

शिरवाडकर यांचे १९७० साली प्रकाशित झालेले ‘वीज म्हणाली धरतीला’ हे एक स्फूर्तिदायक नाटक आहे.  झाशीच्या राणीच्या राणी लक्ष्मीबाईंची गोष्ट अत्यंत काव्यात्मक भाषेत इथे सादर केली आहे.

शिरवाडकरांचे अत्यंत गाजलेले नाटक म्हणजे ‘नटसम्राट’ (१९७१). अनेक भारतीय भाषांत या नाटकाचे अनुवाद झालेले आहेत. हे नाटक म्हणजे एक रंगतदार करुणरम्य खेळ आहे. या नाटकाच्या मागे शेक्सस्पिअरच्या ‘किंगलियर’ची अप्रत्यक्ष प्रेरणा आहे, त्याचे रूपांतर नाही. तर एक स्वतंत्र नाटय़कृती आहे. नाटकाच्या केंद्रस्थानी त्यांनी राजाऐवजी गतकाळातल्या रंगभूमीवरच्या एका श्रेष्ठ नटाची, अप्पासाहेब बेलवलकर यांची योजना केली आहे. वृद्धावस्थेत रंगमंचकावरून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ओढवलेल्या परिस्थितीचे एका असामान्य नटाच्या वृद्धावस्थेचे हे वास्तव चित्रण आहे.  या नाटकातील स्वगते ही शिरवाडकरांच्या लेखनाची खास वैशिष्टय़े झाली आहेत. अनेक मराठी नटश्रेष्ठांना मोह पाडणाऱ्या या नाटकाने व्यावसायिकदृष्टय़ा चमत्कार वाटावा इतके प्रचंड यश मिळवले आहे. अनेक प्रयोग झाले आहेत. या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार, राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला. शिरवाडकरांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देण्यामध्येही या नाटकाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

शिरवाडकरांच्या काव्यवृत्तीला अनुसरून त्यांच्या नाटकातूनही अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यांनी मानवी मनाच्या खोलीचा शोध घेतलेला दिसतो.  शिरवाडकरांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून नाशिक परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी  ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची स्थापना केली. जनस्थान पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, बालमहोत्सव, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी मेळावे इ. उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात. पहिल्या जागतिक मराठी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५६ मध्ये मालाड- मुंबई येथील उपनगरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. तसे १९६४ मधील गोवा-मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले.  १९८५ मध्ये पुणे विद्यापीठाने डी.लीट. देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला होता.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मोजपट्टी

रोजच्या व्यवहारात लांबी मोजण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना प्रमापी साधने (Measuring tools) असे म्हणतात. वाचिक प्रमापी साधने (Direct measuring tools) व तौलनिक प्रमापी साधने (Indirect measuring tools) असे प्रमापी साधनांचे दोन प्रकार आहेत.

वाचिक प्रमापी साधने : ज्या प्रमापी साधनांवर विशिष्ट खुणा व आकडे असतात व ज्यामुळे मोजमाप सरळ वाचता येते.

तौलनिक प्रमापी साधने : ज्या प्रमापी साधनांवर कोणत्याही विशिष्ट खुणा व आकडे नसतात व ज्यामुळे मोजमापाचा कोणताच बोध होत नाही. तौलनिक प्रमापी साधनाने मोजमाप केल्यावर ते वाचण्यासाठी एखाद्या वाचिक प्रमापी साधनाचा वापर करावा लागतो.

मोजपट्टी – हे एक वाचिक प्रमापी साधन आहे. सरळ रेषेतील अंतर मोजण्यासाठी मोजपट्टीचा वापर करतात.

आकृतीत दाखवलेल्या मोजपट्टीची लघुतम मिती ०.५ मिलिमीटर आहे. म्हणजे कमीत कमी ०.५ मिलिमीटर इतकी अचूक लांबी, या मोजपट्टीने मोजता येते. (आकृतीत दाखवलेल्या पट्टीवरील मापे प्रमाणित नाहीत.)

दशमान मापन पद्धतीनुसार ‘मीटर’ हे माप पायाभूत समजले जाते. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजन व मापे संस्थेच्या पुराभिलेखागारात असलेल्या एका ‘प्लॅटिनम-इरिडियम’च्या सळईवर केलेल्या दोन खुणांमधील अंतर म्हणजे एक मीटर. त्याला सहगुणक लावून किलोमीटर, डेकामीटर, सेंटिमीटर, मिलिमीटर असे रूपांतर केले जाते.

साधारण तीन प्रकारच्या मोजपट्टय़ा व्यवहारात बघायला मिळतात. कंपासपेटीमध्ये असते ती १५० मिलिमीटरची मोजपट्टी. या पट्टीवर दुसऱ्या बाजूस इंचाच्यादेखील खुणा असतात. दुसरा प्रकार म्हणजे ३०० मिलिमीटर म्हणजेच फूटपट्टी. या पट्टीवरदेखील इंचाच्या खुणा असतात. तिसरा प्रकार म्हणजे कापड दुकानात असणारी मीटरपट्टी. ही एक ते दीड मीटर लांबीची धातूची पट्टी असते. या सर्वपट्टय़ांवर एक-एक सेंटिमीटरवर १, २, ३, ४.. याप्रमाणे खुणा केलेल्या असतात व त्या एक सेंटिमीटरमध्ये अजून दहा अशा उपखुणा केलेल्या असतात.

पूर्वी या पट्टय़ा लाकडाच्या बनविलेल्या असत. नंतर त्या प्लॅस्टिकच्या बनविल्या जाऊ लागल्या. सतत वापराने काही काळानंतर या पट्टय़ा झिजतात व त्यात दोष निर्माण होतो. अशा दोषयुक्त मोजपट्टय़ांचा वापर करून केलेले मोजमाप किंवा तयार केलेले उत्पादनही दोष असलेलेच असते. त्यावर उपाय म्हणून यंत्रशाळा व कापडाचे व्यापारी धातूच्या मोजपट्टय़ा वापरतात, त्यामुळे त्याची सहजासहजी मोठय़ा प्रमाणात झीज होत नाही व अचूकता दीर्घकाळ टिकून असते.

सई पगारे- गोखले

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org