पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेला राखीव असल्याने भाजप कोणाला संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भाजप ने ८१ जागांवर महिला उमेदवारी दिली होती. त्यापैकी ५४ महिला निवडून आल्या आहेत. त्यामधील नगरसेविका मुक्ता टिळक यांना महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या महापौरपदी महिला नगरसेविका लवकरच विराजमान होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदीची लाट पाहण्यास मिळाली. तशीच लाट राज्यात झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाली.

महापालिका निवडणुकामध्ये पुणे महापालिकेत भाजप सार्वधिक यश मिळाले असून ९८ उमेदवार निवडून आले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या या निवडणुकीत पानिपत झाले असून दोन्ही पक्ष मिळून ४७, शिवसेना १०, मनसे २, एमआयएम १ आणि अपक्ष ४ असे मिळून १६२ नगरसेवक निवडून आले आहे. यामध्ये भाजप महापालिकेत सत्ताधारी पक्ष ठरला असून यामुळे भाजप चा महापौर होणार आहे. भाजपकडून नगरसेविका मुक्ता टिळक, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, माधुरी सहस्त्रबुध्दे ही नावे महापौरपदाच्या शर्यतीमध्ये असणार आहेत. या चार ही महिलामध्ये मुक्ता टिळक यांना संधी मिळण्याची शक्यता असून त्यांची महापालिकेमध्ये ४ वेळ निवडून जाण्याची आहे. तसेच त्यांनी भाजप गटनेते पदाचा अनुभव असल्याने त्यांची महापौर पदी वर्णी लागेल. मात्र यावर पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.