दुचाकींना रोखणारे सिमेंटचे खांबही कुचकामी

पुणे शहराचे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सध्या काही प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकीच एक प्रकल्प म्हणून जंगलीमहाराज रस्ता ‘मॉडेल रोड’ म्हणून विकसित करण्यात येत आहे. रस्त्याचे सुशोभीकरण होत असताना मूळ रस्त्याची रुंदी कमी झाल्याचा अक्षेप घेण्यात येत आहे. पदपथाची रुंदी मात्र वाढली असल्याने त्यावरून नागरिक मोकळेपणाने चालण्याचा आनंद घेऊ शकतात. मात्र, पदपथावरही दुचाकीस्वार घुसखोरी करीत आहेत. दुचाकींना रोखण्यासाठी सध्या सिमेंटचे खांब उभारण्यात आले असले, तरी दोन खांबांमधून दुचाकी सहजपणे निघू शकते. त्यामुळे हे खांबही कुचकामी ठरत आहेत.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय

स्मार्ट सिटीच्या नावाखाली एकूण चौदा प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी जंगलीमहाराज रस्ता आणि औंध रस्ता यांचे ‘मॉडेल रोड’ म्हणून सुशोभीकरण करण्याचे एकमेव काम मार्गी लागले आहे. या सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून जंगलीमहाराज रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठे पदपथ तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ता कमी झाला आहे. शिवाय पादचाऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून वाढविण्यात आलेल्या पदपथांवरही राजरोसपणे दुचाकीस्वारांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. पादचाऱ्यांना चालताना दुचाकींचा त्रास होऊ नये यासाठी रस्ते आणि पदपथ यांना जोडणाऱ्या जागांवर सिमेंटचे खांब उभे करण्यात आले आहेत. हे खांब पदपथांवर येणारी वाहने रोखण्यासाठी आहेत की वाहने सहज आत यावीत म्हणून आहेत अशा ‘खुबीने’ त्यांची रचना करण्यात आली आहे. कारण दोन खांबांच्या मधून अगदी सहज दुचाकी चालक आपल्या दुचाकी गाडय़ा पदपथांवर आणत आहेत. त्यामुळे यात नेमकी कोणाची सोय महापालिकेने पाहिली अशी शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे हे सिमेंटचे खांब लावण्यातून महापालिकेने नेमके काय साध्य केले आहे असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.

स्मार्ट सिटी योजनेचा एकूण दबदबा पहाता त्यातील कामांचा दर्जा चांगला असावा ही अपेक्षा देखील या कामाने खोटी ठरविली आहे. अद्याप सुशोभीकरण पूर्ण झालेले नसतानाच लावलेले पेव्हर ब्लॉक्स हलण्यासही सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीचे रस्ते हे वाहन चालकांप्रमाणेच पादचार्यांसाठी ही सोयीचे हवेत अशा उद्देशाने जंगली महाराज रस्ता आणि औंध रस्ता यांचा विकास करण्याची महापालिकेची योजना आहे. पण प्रत्यक्षात अवाढव्य पदपथांमुळे वाहतूक कोंडी आणि पदपथांवर दुचाकींची वर्दळ असे विकासाचे अजब चित्र आता पहायला मिळत आहे.