अशोक राजवाडे यांचे ‘समता : व्यापक की संकुचित समूहांची?’ हे पत्र (लोकमानस, १९ सप्टें.) वाचले. रा.स्व.संघाच्या ‘समरसते’च्या संदर्भात त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर प्रतिक्रिया :
 राजवाडे जेव्हा ‘फक्त िहदू समाज’, आणि ‘संपूर्ण समाज’ हे शब्द (विभिन्न अर्थ असल्याप्रमाणे) वापरतात, तेव्हा ते संघाला अभिप्रेत असलेली (स्वा. सावरकरांच्या िहदुत्ववादावर आधारित) िहदुत्वाची व्यापक व्याख्या अर्थातच विचारात घेत नसावेत. स्वा. सावरकरांची िहदुत्वाची व्याख्या : ‘आसिंधु सिंधु पर्यन्ता यस्य भारत भूमिका , पितृभू पुण्यभूश्र्च्ौव स वै िहदुरिती स्मृत ’- प्रसिद्धच आहे. िहदुत्वाची यापेक्षा जास्त व्यापक, विशाल व्याख्या संभवत नाही. त्यामुळे संघ जेव्हा समरसतेचे आवाहन ‘िहदू’समाजाला करतो, तेव्हा त्याच्यापुढे या देशाला आपली पितृभूमी व पुण्यभूमी मानणारा फार मोठा विशाल समाज असतो, राजवाडे ज्याला ‘फक्त िहदू समाज’ म्हणतात, तो नव्हे. जे लोक या देशाला पितृभूमी, पुण्यभूमी काहीच मानत नाहीत, ते आणि जे तसे मानतात, ते, या दोघांना ‘समान’ मानणे, ‘आपले’ मानणे, हे मुळात वैचारिक गोंधळाचे लक्षण आहे, ‘विशालते’चे किंवा ‘व्यापकते’चे नव्हे. या देशाला आपला मानणारे, ते आपले. या देशाला तसे न मानणारे (म्हणजे विभक्त, अलगतावादी, फुटीर वगरे?) तेही आपलेच असे मानल्यास काय साधेल? एवढी अतिविशाल व्यापकता आदर्श म्हणून जरी ठीक असली, तरी देशाच्या सुरक्षेचे काय? जी देशाच्या सुरक्षिततेच्या मुळावर येऊ शकेल, अशी व्यापकता कशासाठी?
 ‘सावरकरांची समता ही फक्त िहदूंपुरती मर्यादित होती, असे त्यांच्या विविध कृतींतून दिसते’ हे जे राजवाडे म्हणतात, तेव्हा त्यांनी स्वा. सावरकरांचे चरित्र वाचावे, अशी सूचना करावीशी वाटते. (लेखक- धनंजय कीर , मे १९८३, मराठी आवृत्ती, प्रकरण ९,सामाजिक क्रांती)त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात, सावरकर िहदू सणांच्या दिवसात मुसलमान व ख्रिश्चन वस्तीत भेटी देऊन, जमाती जमातीत सदिच्छा नि सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत. आपल्या रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांनी जातिनिर्मूलन,अस्पृश्यता निवारणासाठी  केलेल्या प्रयत्नांबद्दल खुद्द आंबेडकरांना आदर होता. आंबेडकरांच्या ‘जनता’पत्रातील एका लेखात म्हटले होते, की रत्नागिरीतील सावरकरांचे कार्य या बाबतीत बुद्धाच्या कार्याइतके निर्वाणीचे आहे. समाजवादी नेते युसूफ मेहेरअली, हे सावरकरांना भेटायला रत्नागिरीस गेले असता, सावरकर त्यांना पतितपावन मंदिरात घेऊन गेले होते.  त्यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रात केलेली कामगिरी पाहिल्यास, त्यांचा उल्लेख समाजसुधारकांच्या यादीत समावेशाच्या संदर्भात- ‘अशा व्यक्तीचा’ (?) असा करण्याचे धाडस राजवाडेच करू शकतात.
 संकुचिततेचा दोष पत्करूनही, सावरकर सदैव वास्तववादी राहिले. त्यांचे चरित्रकार लिहितात, ‘‘उत्तुंग आकाशात विहरणाऱ्या कल्पनामेघांत डोके खुपसून राहण्याची त्यांची वृत्ती नव्हती.’’ सध्या जगभरात धुमाकूळ घालणारी इस्लामची जिहादी आक्रमकता पाहिल्यावर, सावरकरांचे वास्तववादी विचार किती अचूक होते, हे लक्षात येईल.   समता, न्याय, मानवता, बंधुभाव, शांतता या सगळ्या ‘किती उंचीवरून’ पाहण्याच्या गोष्टी आहेत, ते सावरकरांना पूर्ण माहीत होते आणि संघालाही चांगले अवगत आहे. प्रश्न आहे तो हे सगळे अत्युच्च आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्यांचा आग्रह जगाच्या व्यासपीठावर प्रभावीपणे धरण्यासाठी, आधी एक राष्ट्र म्हणून समर्थपणे उभे राहण्याचा. त्यासाठी, वास्तवाच्या जमिनीवर पाय भक्कमपणे रोवलेले असण्याची गरज आहे, नुसते आदर्शाच्या, कल्पनांच्या आकाशात उत्तुंग भराऱ्या घेण्याची नव्हे.  त्यामुळे, ‘‘..प्रश्न विचारीत राहणे, ही एक उत्तम सामाजिक कृती ..’’ राजवाडय़ांसाठी  असेलही, पण संघासाठी, िहदू संघटन (िहदू शब्दाच्या सावरकरप्रणीत व्यापक व्याख्येनुसार) ही अत्यावश्यक उत्तम कृती आहे.

संकुचिततेशी समरसता लादताना..
‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमातून आपण सामाजिक जागृतीचे कर्तव्य चांगल्या रीतीने पार पाडत आहात. त्या चच्रेची काही वृत्ते तसेच अशोक राजवाडे यांचे ‘समता : व्यापक की संकुचित समूहांची?’ हे पत्र (लोकमानस, १९ सप्टें.) वाचले. समरसतेच्या भोंगळपणाविषयी आणि नेत्याच्या चुकीच्या उदात्तीकरणाविषयी राजवाडे यांनी घेतलेले आक्षेप योग्यच आहेत.
‘लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज’मध्ये झालेल्या चच्रेत (लोकसत्ता, ११ सप्टें. २०१२)  सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात ‘आम्ही ज्याला अखंड भारत म्हणतो किंवा भौगोलिकदृष्टय़ा ‘इंडो-इराणीयन प्लेट’ म्हटल्या जाणाऱ्या परिसरातील लोकांचे डीएनए समान आहेत. या गोष्टींना आम्ही िहदुत्वाची लक्षणे मानतो.’ प्रश्न असा आहे की समान ‘डीएनए’मध्ये समरसता साधताना कोणी कोणाच्या आचारा-विचारांशी समरसता साधावयाची? डीएनए हेच िहदुत्वाचे लक्षण धरले आणि ‘आमची िहदुत्वाची संकल्पना सांप्रदायिक नाही’ ही ग्वाही जर खरी मानली, तर ‘या देशाच्या, समाजाच्या परंपरा लक्षात घेऊन कार्यक्रम ठरवावे लागतात’ हा इदाते यांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम भागवत यांना अमान्य आहे असे समजावयाचे काय? एका नेत्याने एक भूमिका घ्यावयाची आणि त्याच राजकीय पक्षाच्या दुसऱ्या नेत्याने विरुद्ध भूमिका घ्यावयाची असाच वैचारिक विसंवाद इदाते आणि भागवत यांच्यात आहे काय?
कथा या ऐतिहासिक सत्य नसल्या तरी शंबूक किंवा एकलव्य या समान ‘डीएनए’च्या व्यक्तींना जेते कशी वागणूक देतात? त्याचे आदर्श यांच्या पूजनीय ग्रंथात नमूद आहेत. समरसतेच्या गोंडस नावाखाली कोणते विचार लादले जातात ते स्पष्ट व्हावे.
‘यात्रेकरू’ या लेखात (लोकसत्ता, २ सप्टें. २०१३) सतीश कामत यांनी ‘निरनिराळ्या राजकीय नेत्यांनी आपले छुपे-उघड अजेंडे घेऊन वेगवेगळ्या ‘यात्रा’ काढल्या’ याची तपशीलवार माहिती दिली आणि ‘कन्याकुमारी ते कोलकाता अशी ही नियोजित यात्रा म्हणजे समरसता मंचासह विविध प्रकारे प्रयत्न करूनही गळाला न लागलेला हा मासा पुन्हा एकदा आपल्याकडे खेचण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावर केलेला प्रयोग म्हणता येईल’, अशी टिप्पणी केली हे नमूद व्हावे.
-राजीव जोशी, नेरळ

महान कलावंतांची सरकारी ‘किंमत’!
टपाल खात्याने भारतातील अत्यंत दिग्गज गायक तसेच वादकांवर नुकतीच ८ टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. रविशंकर, भीमसेन जोशी, डी. के. पट्टाम्मल, गंगुबाई हनगळ, कुमार गंधर्व, विलायत खान, मल्लिकार्जुन मन्सूर, अली अकबर खान हे ते महान कलावंत.
 या सर्व कलावंतांची टपाल तिकिटे  एकाच कागदावर, एकत्र संच म्हणून छापण्यात आली आहेत. पण आश्चर्याची गोष्ट अशी की यापकी रविशंकर आणि भीमसेन जोशींच्या तिकिटांच्या छपाईत, चित्रात, रंगात कसलाही खास फरक नसताना त्यांची किंमत मात्र प्रत्येकी २५ रुपये असून त्याच्या शेजारीच छापलेल्या इतर सहा जणांच्या तिकिटांची प्रत्येकी किंमत पाच रुपये आहे. रविशंकर आणि भीमसेन जोशी हे ‘भारत रत्न’ म्हणून त्यांच्या तिकिटांची किंमत जास्त! वास्तविक हे सर्व कलावंत खूपच श्रेष्ठ. सर्वच जण संगीतप्रेमींसाठी भारत रत्नच. पण सरकार सर्वानाच भारत रत्न  देऊ शकले नाही म्हणून टपाल खात्याने त्यांच्या तिकिटांच्या किमतीत असा केलेला फरक अनाकलनीय असून खरे तर सर्वाचीच सारखी किंमत ठेवायला हवी होती.   
– मकरंद करंदीकर, अंधेरी(पू), मुंबई</strong>

ही मंडळी सत्तेवर आल्यास  राज्याचे काय होईल ?
महाराष्ट्रात सध्या युती व आघाडय़ांचा जो तमाशा चालला आहे ते पाहून फारच निराश व्हायला होते. सध्या ही नेते मंडळी रात्र-रात्र बसून जी जागांची सूत्रे ठरवत आहेत, त्या ऐवजी यांनी सत्तेत आल्यावर जर जनकल्याणासाठी अशा प्रकारच्या चर्चा केल्या तर महाराष्ट्रावर पराकोटीचे उपकार होतील. जेव्हा या मंडळींकडे सत्ता असते तेव्हा मात्र ही मंडळी कोणत्याच प्रश्नावर  विचार करताना दिसत नाही. सध्या सर्वच पक्ष आपण निवडून आल्याच्या थाटातच बोलताना दिसतात. काहींनी कुणाला खडी फोडायला तुरुंगात पाठवणार याच्या बाता मारायलाही सुरुवात केली. ही मंडळी सत्तेवर आल्यास महाराष्ट्राचे काय होईल, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.
-संदेश साईनाथ झारापकर, ठाणे</strong>