’कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालक परवाना असणे आवश्यक आहे. परवानाविना वाहन चालविणाऱ्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येऊ शकते. 

– ’वाहन परवाना मिळविण्यासाठी वयाचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला), निवासी पत्त्याचा पुरावा (पारपत्र, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र), वैद्यकीय प्रमाणपत्र, आणि तीन छायाचित्रे अर्जासोबत द्यावी लागतात.
– ’बाद झालेला परवान्याचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे, नाहीतर तो ग्राह्य धरला जात नाही.
– कुठे मिळेल?
– ’ठाणे : आरटीओ कार्यालय, मध्यवर्ती कारागृहाजवळ, ठाणे (प.), दूरध्वनी क्र. : ०२२-२५३४३५८०, ०२२-२५३६३८३८, ०२२-२५४४२५५५.
– ’आरटीओ कार्यालय, पूर्व द्रूतगती महामार्ग, एलआयसी कार्यालयाजवळ, ठाणे (प.), दूरध्वनी क्र. : ०२२-२५८२३४००
– ’कल्याण : आरटीओ कार्यालय, सह्याद्री नगर, चिकनघर, बिर्ला महाविद्यालयाजवळ, कल्याण (प.)
– दूरध्वनी क्र. : ०२५१-२२३०५०५