बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनेलिया देशमुख यांची जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. रितेशने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिनेलिया रितेशला काय समजते हे त्याने सांगितले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला रितेश बोलतो की ‘माझी पत्नी मला देव समजते.’ त्यावर जिनेलिया बोलते, ‘हो हे सत्य आहे.’ त्यानंतर रितेश बोलतो, ‘मी इथे नाही असे ती दाखवते आणि फक्त जेव्हा तिला काही पाहिजे असेल तेव्हा माझ्याजवळ येते.’ हा व्हिडीओ शेअर करत ‘माझी पत्नी मला देव समजते,’ असे कॅप्शन रितेशने दिले आहे.
आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…
View this post on Instagram
रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही.