‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात आज विवाहबंधनात अडकणार आहे. वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. वनिता व सुमितच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मेहेंदी सोहळ्यानंतर त्यांच्या हळदीचा कार्यक्रमही पार पडला.

वनिताच्या हळदीच्या कार्यक्रमातील फोटो तिच्या मित्रमैत्रिणींनी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये वनिता स्वत:च्याच हळदीत डिजेच्या तालावर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. वनिताचा हळदी कार्यक्रमातील हा फोटो व्हायरल होत आहे. हळदीच्या रंगात रंगल्यानंतर आता वनिता व सुमित बोहल्यावर चढणार आहेत.

हेही वाचा>> वनिता खरातची लगीन घटिका समीप; अभिनेत्रीने शेअर केला हिरवा चुडा भरलेला फोटो

vanita kharat dance

हेही वाचा>> ८४ खोल्या, ७० गाड्या अन् लक्झरी व्हिलाचं बुकिंग; सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या लग्नाची जय्यत तयारी

हळदी कार्यक्रमाआधी वनिताच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. वनिताच्या मेहेंदीच्या कार्यक्रमात हास्यजत्रेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. नवरा-नवरी, डोली, सनई-चौघडेचं डिझाइन असलेली सुमितच्या नावाची मेहेंदी वनिताने तिच्या हातावर काढली होती. त्यानंतर वनिताने हिरवा चुडा भरलेला नव्या नवरीच्या हाताचा फोटोही शेअर केला होता.

हेही वाचा>> “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

वनिताने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.