भाजपच्या धंतोली कार्यालयात तयार करण्यात आलेल्या ‘वॉर रुम’ मधून विदर्भातील दहा लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंथन आणि राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवल्या जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>वैद्यकीय शिक्षण खात्याचे बदली धोरण वादात; आयुर्वेद शिक्षकांच्या बदल्यांमुळे पदव्युत्तर जागा, ‘पीएचडी’ला कात्री

आगामी महापालिका निवडणुकासह विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नागपुरात धंतोलीतील पक्ष कार्यालयात ‘वॉर रुम’ तयार करण्यात आली असून याचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात विविध शहरात ‘वॉर रुम’ तयार करण्यात येणार आहे. नागपूरनंतर लवकरच औरंगाबाद व नाशिक येथे सुरू केली जाणार आहे. समाज माध्यम आणि कार्यकत्याशी संवाद या ‘वॉर रुम’मधून होईल. विदर्भातील विविध जिल्ह्यातील बुथवरील ‘डाटा’ आम्ही तयार करतो आहे. त्या ‘डाटा’चे व्यवस्थापन या ठिकाणी होईल. २० घरांना एक कार्यकर्ता आम्ही जोडणार आहे. त्याचे पूर्ण व्यवस्थापन या ‘वॉर रुम’मधून होईल. प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचा डाटा येथे मिळणार आहे.या ‘वॉर रुम’ला सरल ॲप जोडणार आहे. तीन कोटीचा डेटा व्यवस्थापन आम्ही करत असल्याचे बावनकुळे म्हणाले. विशेषत: १८ ते २५ या वयोगटातील युवा वॉरियरला जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>संमेलनाच्या मांडवातून.. कोटींची ‘कृतज्ञता’!

‘वॉर रुम’मध्ये विविध क्षेत्रांतील विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ कार्यरत राहणार आहेत. सरकारी याेजनांच्या त्वरित अंमलबजावणीसाठी भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी हे ‘वाॅर रुम’ सुरू करण्यात आले आहे. नगर परिषदांपासून लाेकसभेपर्यंतच्या निवडणुकांची व्यूहरचना तयार करण्यासाठी माहिती गोळा करून देणे ही जबाबदारी या वॉर रूमवर आहे.शिवाय बुथ पातळीपासून मतदानाचे ट्रेंड तपासणे, निवडणुकांतील बदलते राजकीय समीकरण, प्रत्येक वाॅर्ड किंवा मतदार संघ जिंकण्यासाठी काय करता येईल, याचे सर्वांगीण विश्लेषण येथून केले जाईल. त्यासाठी राज्यभर विश्लेषक तज्ज्ञांची टीम ‘वाॅर रुम’ने उभी करण्यात आली आहे. नगरसेवक ते खासदारांची कामगिरी कशी आहे. लाेकमानसात त्यांची प्रतिमा कशी आहे, याचे स्वतंत्र सर्वेक्षणही ‘वाॅर रुम’ मधून केले जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.