सोमवारी(२० फेब्रुवारी) चेंबूर येथे एका संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने हजेरी लावली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरुन खाली उतरताना सोनू व त्याचे सहकारी मंचावरुन खाली उतरत होते. यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या सगळ्या प्रकरणात सोनू निगमचा सहकारी रब्बानी खानची चर्चा होत आहे.

मंचावरुन खाली उतरत असताना झालेल्या धक्काबुक्कीमध्ये सोनू निगमचा मित्र रब्बानी खान जमिनीवर कोसळले. यावेळी त्याला दुखापत झाली. रब्बानी सोनू निगमला वाचवण्यासाठी पुढे आला. पण हा रब्बानी खान नेमका कोण आहे? याबाबत आता सगळीकडेच चर्चा रंगत आहे.

आणखी वाचा – सैफ अली खानचं लग्न झाल्यावर लेकापासून विभक्त राहू लागल्या शर्मिला टागोर, म्हणाल्या, “आईला गृहित धरलं जातं कारण…”

कोण आहे रब्बानी खान?

रब्बानी हा सोनू निगमचा जवळचा मित्र व एक गायकही आहे. या कार्यक्रमाला सोनूबरोबर रब्बानीने हजेरी लावली होती. सोनू निगमला वाचवण्यासाठी तो पुढे सरसावला. दरम्यान त्याला दुखापत झाली. रब्बानी हा सुप्रसिद्ध गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा आहे.

आणखी वाचा – Video : “लोकांना का त्रास देता?” अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘शिव तांडव स्तोत्रम्’ गातानाचा व्हिडीओ, नेटकऱ्यांना संताप अनावर

आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत रब्बानीही गायन क्षेत्रामध्ये नाव कमावत आहे. ‘अल्लाह हू अल्लाह’, ‘पीर मेरी पिया जाने ना’ सारखी गाणी रब्बानीने गायली आहेत. या दोन गाण्यांमुळेच रब्बानीला खरी ओळख मिळाली. पण अजूनही कलाक्षेत्रामध्ये अधिकाधिक काम करण्यास तो धडपडत आहे.