शरद पवार यांना राजकारणातून घरी बसवण्यासाठी अजित पवार यांना भाजपानं सुपारी दिली आहे. त्यापद्धतीनं अजित पवार काम करत आहेत, असं विधान माजी मंत्री, अनिल देशमुख यांनी केलं होतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रीपद न मिळाल्यानं देशमुख आमच्याबरोबर आले नाहीत, असा दावा अजित पवारांनी केला आहे. ते कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अजित पवार म्हणाले, “अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. ‘मला मंत्रीमंडळात स्थान मिळालं पाहिजे,’ असं देशमुखांनी म्हटलं होतं. पण, भाजपाकडून सांगण्यात आलं की, ‘आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिलं, तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नाही.'”

rohit pawar ajit pawar
“रोहितच्या उमेदवारीला शरद पवारांचा विरोध, पण मीच…”, अजित पवारांच्या दाव्यावर रोहित पवार म्हणाले…
Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले, “रशियाचे पुतिन आणि मोदी…”
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

हेही वाचा : “बारामती लोकसभेची जागा लढवणारच,” अजित पवारांचा निर्धार, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

“मग, मंत्रीपदाच्या यादीतून देशमुखांचं नाव वगळलं गेलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं, ‘मला मंत्रीपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही.’ ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं.

हेही वाचा : “जयंत पाटलांनी प्रकाश सोळंकेंना प्रदेशाध्यक्षपदाचा शब्द दिला होता, पण…”, अजित पवारांचा गौप्यस्फोट

बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “मी बारामती, रायगड, सातारा, शिरूर येथे उमेदवार दिल्यावर, बाकीचे कोण काय करणार? याचं मी काय सांगू. चारही ठिकाणी उमेदवार दिले जातील. ते निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं जाईल.”