नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय  लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीने घेतलेला आहे,  आरक्षण न्यायालयात टिकणार  ही जवाबदारी सरकार स्वीकारणार आहे का?  सरकार  समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली.

अनिल देशमुख प्रसार माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केली  आहे,  त्यामुळे त्यांनी आंदोलनाची  घोषणा केली आहे. सरकारच्या निर्णयावर ते खुश नाही. आरक्षण न्यायालयात टिकेल याची त्यांना शाश्वती नाही.  सरकारने  मराठा समाजाला विश्वासात घ्यावे असेही देशमुख म्हणाले.

Uddhav Thackeray
“शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट प्रहार; म्हणाले “इंजिनाची चाकं…”
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

हेही वाचा >>>जलसंधारण अधिकारी परीक्षेचा पेपर फुटला, विभागाच्या अधिकाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडली!

शरद पवार यांनी काढलेला पक्ष व चिन्ह काढून इतरांना दिले. अदृश्य शक्तीच्या सहकार्याने हे घडवून आणले जात आहे. याबाबत  न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तेथे  आम्हाला नक्की न्याय मिळेल, असा विश्वास आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना शरद पवार गटाला अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहे असा आरोप देशमुख यांनी केला. भारतीय जनता पक्ष स्वतःचा ताकदीवर निवडून येऊ शकत नसल्याने ईडी, सीबीआयची भीती दाखवून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना भाजपात आणले जात आहे. यावरून भाजपची ताकद कमी झाली हे लक्षात येते , महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा >>>ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात कंत्राटी वीज कर्मचारी रस्त्यावर; ‘या’ आहेत मागण्या…

शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे, सरकारने सहानुभूती पूर्वक विचार करून शेतमालाला भाव द्यावा. केंद्र सरकारचे शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेत त्यांचे समाधान केले पाहिजे. पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने निर्णय घ्यावे. कांद्याचे दर पुन्हा आज कोसळले, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कापसाचे भाव पडले आहे,परदेशातून कापूस आयात केला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे.

 बांगला देशात संत्र्याला चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होता, पण निर्यातदार १८ रुप्यावरून ९८ झाला असल्याने संत्रा भाव पडले आहे, सरकार लक्ष देत नाही असेही देशमुख म्हणाले. ड्रगचे रॅकेट  अनेक शहरात  सुरू आहे. यासाठी आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.  हा व्यवहार कसा चालतो  याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सतर्क राहून कारवाई केल्यास महाराष्ट्राचा उडता पंजाब होणार नाही असेही देशमुख म्हणाले.