धाराशिव : वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे संजयकुमार वाघमारे यांनी गुरूवारी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. आजवर १५ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले असून ६९ उमेदवारांनी आजवर १५५ उमेदवारी अर्जांची खरेदी केली आहे.

शुक्रवार, १२ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात झाली. १५ एप्रिल रोजी मागील निवडणुकीत वंचितकडून उमेदवार राहिलेले अर्जून सलगर यांच्यासह नवनाथ दुधाळ आणि आर्यनराजे शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली. १६ एप्रिल रोजी महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मनोहर आनंद पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. गुरूवार, १८ एप्रिल रोजी दिवसभरात नऊ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.

आणखी वाचा-कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर, बहुजन समाज पार्टीचे संजयकुमार वाघमारे यांचा समावेश आहे. तर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही गुरूवारी आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या व्यतिरिक्त शायनी नवनाथ जाधव, नितेश शिवाजी पवार, रहिमोद्दीन काझी, ज्ञानेश्वर नवनाथ कोळी, उमाजी गायकवाड आदींनी उमेदवारी दाखल केली आहे. शुक्रवार, १९ एप्रिल उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून २० एप्रिल रोजी छाननी व २२ एप्रिल उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे.