WPL Final 2024 Highlights, DC vs RCB : महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा अंतिम सामना १७ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सवर ८ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे.

IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Jalal Yunus Says Mustafizur Rahman has nothing to learn in IPL
‘IPLमध्ये शिकण्यासारखे काहीच नाही…,’ मुस्तफिझूरला परत बोलावल्यानंतर BCB अध्यक्षांचे चकित करणारे वक्तव्य
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ
Live Updates

WPL Final 2024 Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले.

22:43 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : दिल्ली कॅपिटल्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवत, आरसीबीने पटकावलं पहिलंवहिलं जेतेपद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. बंगळुरूच्या पुरुष संघाने कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही, परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात विजय मिळवत इतिहास रचला आहे.

https://twitter.com/RCBTweets/status/1769410242687762877

लक्ष्याचा पाठलाग करताना सोफी डिव्हाईन आणि स्मृती मंधाना यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. ही भागीदारी शिखा पांडेने ३२ धावा करणाऱ्या डिव्हाईनला बाद करून तोडली. यानंतर कर्णधार मंधानाने डावाची धुरा सांभाळली, मात्र मिन्नू मणीने तिला ३१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.

22:37 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : आरसीबीला ११ धावांची गरज

आरसीबीला १२ चेंडूत ११ धावांची गरज आहे. दिल्लीला चमत्काराची आशा आहे. एलिस पेरी आणि रिचा घोष क्रीजवर उपस्थित आहेत.

22:21 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : आरसीबी संघाला मोठा धक्का! कर्णधार स्मृती मंधाना ३१ धावांवर बाद

आरसीबी संघाला १५ व्या षटकांत मोछा धक्का बसला आहे. कर्णधार स्मृती मंधाना ३१ धावांवर बाद झाली आहे. स्मृतीला अरुंधती रेड्डीने मिन्नू मनीच्या हाती झेलबाद केले आहे. सध्या १५ षटकानंतर आरसीबी संघाची धावसंख्या २ बाद ८२ धावा आहे.

https://twitter.com/Ipl_scoop/status/1769406074535247885

22:08 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : पहिल्या विकेटनंतर आरसीबी संघाची धावसंख्या मंदावली

१२ षटकानंतर आरसीबी संघाने १ बाद ६१ धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार स्मृती मंधाना २४ आणि एलिस पेरी ५ धावांवर खेळत आहे. संघाला विजयासाठी ५३ धावांची गरज आहे.

21:58 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : आरसीबीला पहिला धक्का बसला

दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला पहिला धक्का देत सलामीवीर सोफी डिव्हाईनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दिल्लीसाठी शिखा पांडेने डिव्हाईनला बाद केले. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेली डिव्हाईनल ३२ धावा करून बाद झाली. सध्या स्मृती मंधाना आणि एलिस पॅरी क्रीजवर आहेत. आरसीबीने नऊ षटकांअखेर एका विकेटवर ५३ धावा केल्या आहेत आणि अद्याप ६६ चेंडूत ६१ धावांची गरज आहे.

https://twitter.com/CricArjun/status/1769400281094352929

21:55 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : स्मृती-सोफीकडून आरसीबीच्या डावाला सावध सुरुवात

कर्णधार स्मृती मंधाना आणि सोफी डिव्हाईनची जोडीने आरसीबी चांगली सुरुवात करु दिली आहे. या जोडीने ६ षटकानंतर संघाची धावसंख्या बिनबाद २९ धावांवर पोहोचवली आहे. स्मृती १२ आणि सोफी १७ धावांवर खेळत आहे.

21:33 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : आरसीबीच्या डावाला सुरूवात

दिल्लीने दिलेल्या ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीच्या सलामीवीर मैदानात उतरल्या आहेत. कर्णधार स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईनची जोडी मैदानात आहे.पहिल्याच षटकात डिव्हाईनने चौकार लगावत शानदार सुरूवात केली.

21:08 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : दिल्ली कॅपिटल्सचे आरसीबीला ११४ धावांचे लक्ष्य

डब्ल्यूपीएल २०२४ चा अंतिम सामना अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात खेळला जात आहे. श्रेयंका पाटील आणि मोलिनक्सच्या शानदार गोलंदाजीमुळे आरसीबीने दिल्लीचा डाव १८.३ षटकांत ११३ धावांत आटोपला. दिल्ली कॅपिटल्सकडून शफाली वर्माने सर्वाधिक ४४ धावा धावांची खेळी साकारली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीच्या संघाला शफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळ करत आरसीबीच्या गोलंदाजांवर दडपण आणले, पण आठवे षटक टाकण्यासाठी आलेल्या डावखुरी फिरकी गोलंदाज मोलिनक्सने या षटकात शफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद करत दिल्लीचा डाव खिळखिळा केला.

यानंतर श्रेयंका पाटीलने दिल्लीच्या फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. दिल्लीची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, एकेकाळी बिनबाद ६४ धावा करणारा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि ११३ धावांवर बाद झाला. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने चार, मोलिनक्सने तीन आणि आशाने दोन गडी बाद केले. विशेष म्हणजे आरसीबीच्या फिरकीपटूंनी नऊ विकेट घेतल्या तर राधा यादव धावबाद झाली.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1769385632906768499

21:02 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : दिल्ली कॅपिटल्सला नववा धक्का

आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा डाव सतत ढासळत असून त्याची नववी विकेटही पडली आहे. ६४ धावांवर पहिली विकेट गमावणाऱ्या दिल्लीच्या संघाने ११३ धावांच्या स्कोअरवर नऊ विकेट गमावल्या आहेत.

https://twitter.com/harjotsingh670/status/1769386048130630034

20:56 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : दिल्ली कॅपिटल्सला आठवा झटका, राधा यादव झाली धावबाद

दिल्ली कॅपिटल्सला १०१ धावांवर आठवा धक्का बसला. संघाला ६४ धावांवर पहिला धक्का बसला आणि आता १०१ धावांपर्यंत मजल मारून संघाने आठ विकेट गमावल्या आहेत. सध्या शिखा पांडे आणि अरुंधती क्रीजवर आहेत. आरसीबीसाठी डावखुरी फिरकीपटू मोलिनेक्सने तीन विकेट्स घेतल्या, तर श्रेयंका आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

https://twitter.com/FaRhaNAli_1000/status/1769384594594283914

20:44 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : श्रेयंका पाटीलने दुसरी विकेट घेताना दिल्ली कॅपिटल्सला दिला सातवा धक्का

१५ व्या षटकात श्रेयंका पाटील आक्रमणात आली आणि दुसरी विकेट घेतली. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मिन्नू मणी एलबीडब्ल्यू आऊट झाली.

https://twitter.com/ppushp7/status/1769381801523589197

20:36 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : आशा शोभनाने दिल्ली कॅपिटल्सला दिला सहावा धक्का

आशा शोभनाने १४व्या षटकात आरसीबीला दोन यश मिळवून दिले. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मारिजाने कॉप मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात लाँग ऑनवर झेलबाद झाली. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जेस जोनासेनही याच पद्धतीने झेलबाद झाली.सध्या दिल्ली धावसंख्या ६ बाद ८० धावा आहे.

https://twitter.com/irishabhparmar/status/1769380149311504680

20:32 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : श्रेयंका पाटीलने दिल्ली कॅपिटल्सला दिला चौथा धक्का

दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम सामन्यात चांगली सुरुवात करूनही स्वत:ला बॅकफूटवर ढकलले आहे. संघाने ७४ धावांत चार विकेट गमावल्या. श्रेयंका पाटीलने दिल्लीला चौथा धक्का दिला. दिल्लीचा स्कोअर ७४/४ आहे.

https://twitter.com/Cric__scene93/status/1769377975752102335

20:23 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : सोफी मोलिनक्सने आरसीबीसीचे केले पुनरागमन

सोफी मोलिनक्सने एकाच षटकात तीन बळी घेत अंतिम सामन्यात आरसीबी संघाला दमदार पुनरागमन केले. या सामन्यात दिल्लीचा संघ एकही विकेट न गमावता अतिशय वेगाने धावा करत होता. मात्र आता १० षटकात ३ बाद ७१ धावा केल्या आहेत. सोफी मोलिनक्सने तिच्या दुसऱ्या षटकात तीन बळी घेत आरसीबीचे सामन्यात पुनरागमन केले.

https://twitter.com/Cric__scene93/status/1769377975752102335

20:14 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : मोलिनक्सने एक षटकात दिल्लीला दिले ३ धक्के

आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शफाली वर्माला बाद केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोलिनक्सने जेमिमाह रॉड्रिग्जला बाद केले. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना जेमिमा पूर्णपणे चुकली आणि चेंडू थेट ऑफ स्टंपवर आदळला. दिल्लीचा त्रास इथेच संपला नाही कारण पुढच्याच चेंडूवर नवीन फलंदाज ॲलिस कॅप्सी लॅप शॉट मारण्याच्या प्रयत्नात बाद झाली. एका षटकात तीन विकेट घेत मोलिनक्सने आरसीबीला सामन्यात परत आणले आहे.

https://twitter.com/NashraRizvi110/status/1769373180911641012

20:11 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : शफाली वर्माचे अर्धशतक हुकले

आरसीबीविरुद्धच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसणारी सलामीवीर शेफाली वर्माचे अर्धशतक हुकले. आठव्या षटकात सोफी मोलिनक्सने आरसीबीला पहिले यश मिळवून दिले. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर शफाली वर्माने गुडघ्यावर बसून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण सीमारेषेवर जॉर्जिया वॉरहॅमने दोरीवर अप्रतिम झेल घेतला.

19:59 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : लॅनिंग-शफालीची अर्धशतकी भागीदारी

दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्ध वेगवान सुरुवात केली आहे. कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळी करत दिल्लीला चांगल्या स्थितीत आणले आहे. पाच षटकांनंतर धावसंख्या बिनबाद ५२ धावा आहे. पाचवे षटक संपल्यानंतर शफालीने १८ चेंडूत ३७ धावा आणि लॅनिंगने १२ चेंडूत १३ धावा केल्या.

19:52 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : दिल्ली कॅपिटल्सची वेगवान सुरुवात

दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्ध वेगवान सुरुवात करत ४ षटकांत एकही बाद ४१ धावा केल्या आहेत. कर्णधार मेग लॅनिंग १३ धावा आणि शेफाली वर्मा २६ धावा केल्या आहेत यादरम्यान शेफालीने मोलिनक्सच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला, जो दिल्लीच्या डावातील पहिला षटकार होता.

https://twitter.com/AayanSharma45/status/1769367570577314281

19:46 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : दिल्ली कॅपिटल्सची वेगवान सुरुवात

दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीच्या फलंदाज शफाली वर्मा आणि मेग लॅनिंग यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या दोन षटकात १९ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/GullyCricket_er/status/1769366398290313422

19:39 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : पहिल्या षटकातच उडाली दिल्लीची धांदल, कर्णधार मेग लॅनिंग थोडक्यात बचावली

आरसीबीविरुद्धच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा डाव सुरू झाला आहे. शफाली वर्मा दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगसह प्रथम फलंदाजीसाठी उतरली आहे. त्याचवेळी पहिल्या षटकात वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आरसीबीसाठी गोलंदाजी करण्यासाठी आली. या पहिल्या षटकात मेग लॅनिंग रनआऊट होताना थोडक्यात वाचली. दिल्लीने पहिल्या षटकांत बिनबाद ९ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/imfemalecricket/status/1769365064589709539

19:22 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : स्मृती मंधाना काय म्हणाली?

स्मृती मंधाना म्हणाली, "आम्ही देखील प्रथम फलंदाजी केली असती, परंतु मला वाटते की ते खरोखर चांगले झाले नाही, आम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, आमच्या योजनांवर टिकून राहावे लागेल आणि चांगले क्रिकेट खेळावे लागेल. आत्तापर्यंत आम्ही खूप चढ-उतार पाहिले आहेत, पण आज रात्री आम्हाला आमची सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. याच विकेटवरचा हा चौथा सामना, शेवटचा सामना, संथपणे खेळला गेला. आमच्या टीममध्ये एक बदल झाला आहे. दिशा करातच्या जागी मेघना आली आहे."

19:20 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : मेग लॅनिंग काय म्हणाली?

नाणेफेक जिंकल्यानंतर मेग लॅनिंग म्हणाली, "आम्ही आज फलंदाजी करू, मला वाटते की सामना जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. खेळपट्टी चांगली दिसत असून आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. यापूर्वी जे घडले ते अप्रासंगिक आहे, आम्ही एका मोठ्या संघाविरुद्ध खेळत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले खेळण्याची गरज आहे. आम्ही जुन्या प्लेइंग इलेव्हनसोबत खेळत आहोत."

19:10 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.

https://twitter.com/wplt20/status/1769354152889466959

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मंधाना (कर्णधार), एस मेघना, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेअरहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.

19:07 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॅनिंगने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये श्रद्धा पोखरकरच्या जागी एस मेघनाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मध्ये एंट्री मिळाली आहे.

https://twitter.com/wplt20/status/1769357056853557739

18:47 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : डब्ल्यूपीएल २०२४ ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला किती पैसे मिळणार?

महिला प्रीमियर २०२३ मध्ये, विजेत्या संघ मुंबई इंडियन्सला ट्रॉफी जिंकल्याबद्दल ६ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले होते, तर उपविजेत्या दिल्ली संघाला ३ कोटी रुपये मिळाले होते. त्याचप्रमाणे यावेळीही विजेत्या संघाला ६ कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला ३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

https://twitter.com/wplt20/status/1769351442744172791

18:31 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : अंतिम फेरीत कोण मारणार बाजी?

कोणत्याही क्रिकेटपंडिताला विजेतेपदाचा अंदाज बांधणे सोपे जाणार नाही. मात्र, मैदान, खेळपट्टी, परिस्थिती आणि दोन्ही संघ पाहता अंतिम सामन्यात निकराची लढत होऊ शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दोन्ही संघ प्रथमच चॅम्पियन होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. मात्र, या सामन्यात दिल्ली घरच्या मैदानवर खेळत असल्याने त्याचा वरचष्मा राहिल.

https://twitter.com/JayShah/status/1769011815042969688

18:07 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : एलिस पेरी आणि मेग लॅनिंग यांच्यात टक्कर होणार

महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एलिस पेरीची चमकदार कामगिरी पाहिली आहे, तर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने देखील तिच्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघांना अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आजही दोघींमध्ये रोमांचक टक्कर पाहायला मिळू शकते.

https://twitter.com/wplt20/status/1769276279767863644

17:45 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.

https://twitter.com/wplt20/status/1769258209657966855

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग.

17:30 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : पुरुष संघही अंतिम फेरीत जिंकू शकले नाहीत

आरसीबी आणि दिल्लीच्या चाहत्यांसाठी आजचा खूप खास आहे. दोन्ही फ्रँचायझींच्या पुरुष संघांनाही आजपर्यंत अंतिम सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत जगाला एक नवा विजेता मिळणार आहे. आरसीबी पुरुष संघ तीन वेळा आयपीएलचा उपविजेता ठरला आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सला फक्त एकदाच फायनल खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल २०२० मध्ये संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता. या काळात मुंबईकडून संघाचा दारुण पराभव झाला.

https://twitter.com/wplt20/status/1769298691863580765

17:21 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : घरच्या मैदानावर दिल्लीचा वरचष्मा

या मैदानावर दिल्लीने एकूण चार सामने खेळले आहेत. या तीन सामन्यांमध्ये घरच्या परिस्थितीचा फायदा संघाला झाला आहे. संघाला तीन सामने जिंकण्यात यश आले आहे, तर एका सामन्यात संघाला यूपीकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचवेळी या मैदानावर आरसीबीने चार सामन्यांत केवळ दोनदाच विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दिल्लीचा वरचष्मा आहे.

https://twitter.com/wplt20/status/1769325307608388091

17:19 (IST) 17 Mar 2024
DC vs RCB Final : दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. दिल्लीने आठ सामन्यांपैकी एकूण सहा सामने जिंकले तर आरसीबीने चार सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ लीग स्टेजवर दोनदा आमनेसामने आले होते, ज्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाने दोन्ही सामने जिंकले. आज दोन्ही संघ यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. घरच्या परिस्थितीचा फायदा दिल्ली संघाला मिळू शकतो, असे मानले जात आहे. वास्तविक, हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० पासून खेळवला जाईल.

https://twitter.com/wplt20/status/1768939697168937388

Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore WPL Final 2024 Live Updates in MarathiDelhi Capitals vs Royal Challengers Bangalore WPL Final 2024Highlights : महिला प्रीमियर लीग २०२४ च्या फायनलमध्ये स्मृती मंधानाच्या टीमने ते करून दाखवले, जे विराट कोहलीची टीम गेल्या १६ वर्षांपासून आयपीएलमध्ये करू शकली नाही. आरसीबी पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आहे.