25 October 2020

News Flash

मागील बाजूस तीन कॅमेरे असलेली सॅमसंग फोनची नवीन श्रेणी

सॅमसंगच्या गॅलेक्सी ७ मध्ये एक्सिनॉस २.२ ऑक्टा कोअर हे प्रोसेसर यात असणार आहे.

सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष मोहनदिप सिंग मंगळवारी मुंबईत नवीन ‘गॅलेक्सी ए ७’ फोनच्या श्रेणीचे अनावरण करताना.

मुंबई : सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी जे४ प्लस आणि जे६ प्लसनंतर, आता आपली पहिलीच मागील बाजूला तीन अशा तऱ्हेने एकूण चार कॅमेरा असलेला ‘गॅलेक्सी ए ७’ फोनची नवीन श्रेणी भारतीय बाजारात आणली आहे.

कॅमेरा हेच नवीन गॅलेक्सी ए ७चे महत्त्वपूर्ण अंग असून २१ सप्टेंबरला हा फोन दक्षिण कोरियात सर्वप्रथम प्रस्तुत केला गेला आणि लगोलग तो भारतातही दाखल करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा पहिलाच तीन रिअर कॅमेरा असलेला फोन असून यात मागील बाजूस २४ मेगापिक्सल्स, ५ मेगापिक्सल्स आणि ८ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाइड कॅमेराचा समावेश केला गेला आहे. तसेच, पुढील बाजूला २४ मेगापिक्सल्सच्या सेल्फी कॅमेराची जोड त्याला देण्यात आली आहे.

या फोनच्या अनावरणाच्या प्रसंगी सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष मोहनदिप सिंग म्हणाले,‘आम्ही २० ते ४० हजाराच्या श्रेणी मध्ये फोन वाढवण्यावर भर देतो आहे आणि ग्राहकांच्या मागणी प्रमाणे त्यांना फोन देण्याचा प्रयत्न करत आहोत.’

सॅमसंगच्या गॅलेक्सी ७ मध्ये एक्सिनॉस २.२ ऑक्टा कोअर हे प्रोसेसर यात असणार आहे. या ४ जीबी रॅम व ६४ जीबी इंटरनल मेमरीसाठीच्या फोनची किंमत २३९९० रुपये आहे. तसेच, ६ जीबी व १२८ जीबी इंटरनल मेमरीसाठी २८९९० रुपये या फोनसाठी मोजावे  लागणार आहे. त्याशिवाय ५१२ जीबीपर्यंत याची इंटरनल मेमरी एसडी कार्डने वाढवू शकणार आहे. यात ३३०० एमएएच क्षमतेची बॅटरी, फिंगरप्रिंट सेन्सर, सहा इंची फुल एचडी स्क्रिन देण्यात आली असून अँड्रॉइडच्या ओरियो ऑपरेटिंग प्रणालीवर हा फोन चालणार आहे. तसेच एल वन सर्टिफिकेशनसह हा फोन सगळे व्हिडीओ एचडीमध्ये दिसण्याची सुविधाही यात असणार आहे. गॅलेक्सी ए७ हा फोन २७, २८ सप्टेंबरला फ्लिपकार्ट, सॅमसंगच्या ई-शॉप व बंगळूरुमधील सॅमसंगच्या ओपेरा हाऊसमध्ये उपलब्ध होणार असून त्यानंतर हा फोन सर्वत्र उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या २०२० पर्यंत १२ कोटी फोन वर्षभरात निर्माण करण्यावर सॅमसंगचा भर असणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 5:20 am

Web Title: a new range of samsung phones with three cameras in back side
Next Stories
1 बँकांच्या थकीत कर्जात घसरण! केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा
2 ‘आयएलएफएस’ला तारणहार म्हणून  ‘एलआयसी’कडून मदतीचा हात
3 पडझडविस्तार!
Just Now!
X