ऊर्जा पारेषण उद्योगासाठी स्वतंत्र कंपनी निर्माण करून दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय संधी शोधणारा एक धोरणात्मक निर्णय स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडने घेतला असून, ऊर्जा क्षेत्रातील विघटित कंपनी म्हणून स्टरलाइट पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड ही कंपनी पूर्वनिर्धारित १ एप्रिल २०१५ पासून अस्तित्वात आल्याची घोषणा मंगळवारी केली.
कंपन्याच्या या विघटन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने २२ एप्रिल २०१६ रोजी संमती दिली आहे. त्या अगोदर १५ डिसेंबर २०१५ रोजी स्टरलाइट टेकच्या भागधारकांच्या सभेत या प्रस्तावास भागधारकांची संमती मिळविली गेली होती. गुंतवणूकदारांच्या मते विघटनानंतर कंपनीकडून आर्थिकदृष्टय़ा विविध दालने उघडली गेली आहेत. नवीन अवतारामुळे स्टरलाइट टेक ही जगातील आघाडीची आणि भारतातील एकमेव ऑप्टिकल दळणवळण उत्पादने, सेवा पुरवठादार आणि सॉफ्टवेअर विकासक अशी एकात्मिक कंपनी बनली आहे.
त्याचप्रमाणे एलाइटकोर टेक्नॉलॉजिस ही कंपनी स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेडमध्ये विलीन झाल्याची घोषणादेखील कंपनीने केली आहे. थ्री जी/ एलटीई, वाय-फाय, केबल, एडीएसएल, एफटीटीएचसारख्या सर्व आयपी नेटवर्क्सच्या वाणिज्यिक मुद्रीकरणाची क्षमता एलाइटकोरकडे आहे. तिच्या विलिनीकरणाने दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित सेवा ग्राहकांना उपलब्ध होऊ शकणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2016 रोजी प्रकाशित
विभाजित झालेला स्टरलाइट टेकचा विभाग दूरसंचार क्षेत्रात प्रवेशासाठी सज्ज
कंपन्याच्या या विघटन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने २२ एप्रिल २०१६ रोजी संमती दिली
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 25-05-2016 at 08:14 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demerged sterlite tech becomes pure play telecom player