नवी दिल्ली : वाढत्या ऊर्जानिर्मितीच्या जोरावर प्रमुख क्षेत्राला वर्षांरंभीच वाढ नोंदविता आली आहे. जानेवारी २०२० मध्ये आठ प्रमुख क्षेत्रांचा समावेश असलेला निर्देशांक २.२ टक्क्यांपर्यंत उंचावला आहे.

कोळसा, इंधन शुद्धीकरण उत्पादने, ऊर्जा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, खते आदी समाविष्ट निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक जानेवारी २०१९ मध्ये १.५ टक्के होता.

ऊर्जानिर्मितीसह कोळसा उत्पादन, इंधन शुद्धीकरण उत्पादने या गटातही गेल्या महिन्यात वाढ नोंदली गेली. हे क्षेत्र दोन टक्क्यांपर्यंत वाढले, तर ऊर्जानिर्मितीतील वाढ थेट ८ टक्के राहिली. गेल्या महिन्यात खनिज तेल, नैसर्गिक वायू, खतनिर्मिती क्षेत्रात घसरण नोंदली गेली.

प्रमुख आठ क्षेत्रांनी ऑगस्ट ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान नकारात्मक वाढ अनुभवली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या पहिल्या १० महिन्यांत प्रमुख क्षेत्राची वाढ ०.६ टक्के नोंदली गेली. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती ४.४ टक्के होती. तो वर्षभरापूर्वीच्या तिसऱ्या तिमाही दरम्यान ९.५ टक्के होता. व्यापार, आदरातिथ्य, वाहतूक, दळणवळण तसेच सेवा क्षेत्राची कामगिरी ७.८ टक्क्यांवरून ५.९ टक्के झाली आहे.