प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती २०१७ मध्ये सुरू होणार

माहिती तंत्रज्ञान जागतिक अग्रणी सिस्कोचा पुण्यात प्रकल्प स्थापण्याची योजना  अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी प्रत्यक्ष निर्मिती सुरू होईल, अशी घोषणा बुधवारी येथे करण्यात आली. मुंबई झालेल्या ‘मेक इन इंडिया वीक’ दरम्यान कंपनीने महाराष्ट्र शासनाबरोबर याबाबतचा करार केला होता.

मुंबईत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आयोजित एका कार्यक्रमात सिस्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांनी कंपनीचा पुण्यातील प्रकल्प २०१७ च्या सुरुवातीला सुरू होईल, असे स्पष्ट केले. मात्र याबाबतची नेमकी गुंतवणूक रक्कम तसेच उपलब्ध रोजगारसंख्या त्यांनी या वेळी जाहीर केली नाही.

श्नायडर इलेक्ट्रिककडून ७५० कोटींची गुंतवणूक

भारत दौऱ्यावर असलेल्या श्नायडर इलेक्ट्रिकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जिन पास्कल यांनी भारतातील ७५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

पास्कल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कंपनी भारतातील संशोधन आणि विकास तसेच नवीनता व निर्मिती क्षेत्रात येत्या तीन ते पाच वर्षांत ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे पास्कल यांनी जाहीर केले. कंपनीचे देशात २० हजारांहून अधिक मनुष्यबळ आहे. कंपनीचे जगभरातील ५० शहरांमध्ये २८ निर्मिती प्रकल्प आहेत.