News Flash

घसरण थांबली ‘सेन्सेक्स’मध्ये त्रिशकी भर

सलग तीन दिवसांतील एकूण ९३० अंश घसरणीमुळे सेन्सेक्स ८ ऑगस्ट २०१४ नंतरच्या तळात आला होता.

जागतिक बाजारातील तेजी पाहून गुंतवणूकदारांनी आठवडय़ातील चौथ्या दिवशी केलेल्या समभाग खरेदीपोटी भांडवली बाजाराने गुरुवारी गेल्या तीन व्यवहारानंतर प्रथमच तेजी नोंदविली. ३११.२२ अंश वाढीसह सेन्सेक्स २५,७६४.७८ वर तर १०६ अंशवाढीने निफ्टी ७,८२३ वर पोहोचला.
सलग तीन दिवसांतील एकूण ९३० अंश घसरणीमुळे सेन्सेक्स ८ ऑगस्ट २०१४ नंतरच्या तळात आला होता. चीन, युरोप, अमेरिकेसह प्रमुख बाजारातील घसरणीबरोबरच या भागातील देशांमध्ये औद्योगिक उत्पादन दरात नोंदलेल्या घसरणीवर येथील बाजारही नकारात्मक प्रवास करीत होता.
अमेरिकेतील निर्देशांकांमध्ये गुरुवारी तेजी नोंदली गेल्यानंतर चीनमधील प्रमुख निर्देशांकांनीही त्याची री ओढली. मुंबई शेअर बाजाराने सत्राची सुरुवात २५,६१४.६९ या तेजीसह केली. व्यवहारात सेन्सेक्स २५,८३५.४१ पर्यंत झेपावला. त्याचा तळही २५,५५५ पर्यंतच राहिला.
शतकी अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला दिवसअखेर ७,८२५ नजीकचा टप्पा गाठता आला. व्यवहारात निफ्टी ७,७५४.०५ ते ७,८४५.६० पर्यंत प्रवास करीत होता. गेल्या व्यवहारात ७,८०० चा स्तर सोडणाऱ्या निफ्टीला याबाबत गुरुवारी अखेर यश आले.
सेन्सेक्समधील केवळ तीन समभागांचेच मूल्य घसरले. टाटा स्टील, वेदांता, डीएलएफ तेजीत आघाडीवर राहिले. तर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही उंचावले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅपमध्येही एक टक्क्याहून अधिक वाढ नोंदली गेली.
चालू सप्ताहापासून मुंबई निर्देशांकात आपटी नोंदविली जात होती. यामुळे सेन्सेक्स २५,५०० नजीक येऊन ठेपला होता. तर निफ्टीने त्याचा ८,००० चा स्तरही सोडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:30 am

Web Title: stop fall down in sensex
टॅग : Sensex
Next Stories
1 चलनातील अस्थिरतेने आयटी कंपन्यांत अस्वस्थता
2 चलन अवमूल्यनाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय चर्चापटलावर : जेटली
3 जुने कर-विवाद उकरून न काढण्याचे सरकारचे आदेश  
Just Now!
X