मुंबई : टाटा डिजीटलने एका अघोषित भागभांडवलासाठी फिटनेस-केंद्रित क्युरिट हेल्थकेअरमध्ये ७.५० कोटी डॉलर (५०,५०० कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा सोमवारी केली. या घोषणेबरोबरच क्युरीफिटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी मुकेश बन्सल यांची अध्यक्ष म्हणून टाटा डिजिटलमध्ये कार्यकारी भूमिका वठवतील, असेही स्पष्ट करण्यात आले.

टाटा डिजीटल आपल्या इ-कॉमर्स क्षेत्रात विस्तारासाठी अनेक अधिग्रहणांवर शिक्कामोर्तब करत आहे. यामध्ये फ्लिपकार्ट (यामध्ये बन्सल हे एकेकाळी मायन्ट्राच्या अधिग्रहणानंतर सहभागी होते) अ‍ॅमेझॉन आणि रिलायन्स रिटेलसारख्या दिग्गजांशी स्पर्धा आहे.

टाटा डिजिटलच्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय तंदुरुस्ती व निरोगीपणाची बाजारपेठ वार्षिक २० टक्के वाढत आहे आणि २०२५ पर्यंत ते १२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचतील आणि क्युरीफिट टाटा डिजीटलला सक्रिय आरोग्य व्यवस्थापनाच्या जागेत विस्तारण्यास मदत करेल.