News Flash

झटपट आणि सहज पैसे कमावायचेत; मग हे बिझनेस मॉडेल ट्राय करून पाहा

या बिझनेस मॉडेलचा आतापर्यंत अनेकांनी यशस्वीपणे फायदा करून घेतला आहे

speednspark

माणसाला सुखी आयुष्य जगायचे असेल, तर जीवनात शक्य तितक्या लवकर आर्थिक स्थैर्य प्राप्त होणे गरजेचे आहे. अनेकजण चिकाटी आणि कष्टाच्या साह्याने हे ध्येय साध्यही करतात. मात्र, हल्लीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात थोडासा स्मार्टनेस दाखवल्यास हे ध्येय सहजपणे गाठले जाऊ शकते. अर्थात यासाठी योग्य ती संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळेच जवळपास प्रत्येक सामान्य माणूसमेरा नंबर कब आयेगाअसा विचार करत जीवन बदलून टाकणाऱ्या या संधीच्या शोधात असतो. प्रत्येकालाच ही संधी योग्यवेळी मिळेल असे नाही. मात्र, डॉ. विजय विचारे आणि जपजित सिंग या दोघांनी विकसित केलेल्या एका प्रारूपामुळे (मॉडेल) अनेकांचे आर्थिक स्थैर्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

शिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडू शकतो, असा डॉ. विजय विचारे यांना ठाम विश्वास आहे. ते पेशाने प्राध्यापक असले तरी स्वयंभू सोशल वेल्फेअर सोसायटीया स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते समाजसेवेचेही काम करतात. त्यांची ही संस्था तरूणांना करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करते. तर जपजित सिंग यांना त्यांच्या घराण्यातूनच उद्योगाचे बाळकडू मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे उद्योग व्यवसायाच्या अनेक नवनवीन कल्पना आणि या क्षेत्रातील कामाचा तगडा अनुभव आहे. सामाजिक कार्याची आवड या दोघांमधील समान दुवा आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी या दोघांनी एकत्र येत व्हेलोसिटा फ्लिट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (VELOCITAA FLEET SOLUTIONS PRIVATE LIMITED) ही कंपनी स्थापन केली. या कंपनीनेस्पीड अँण्ड स्पार्कहे अभिनव बिझनेस मॉडेल विकसित केले आहे. या माध्यमातून लोकांना २५००० ते १५०००० लाख इतके मासिक उत्त्पन्न कमावता येऊ शकते. यासाठी त्यांना माफक शुल्क भरावे लागते. ‘स्पीड अँण्ड स्पार्कया बिझनेस मॉडेलचा आतापर्यंत अनेकांनी यशस्वीपणे फायदा करून घेतला आहे. यापैकी अनेक लोक त्यांची नोकरी आणि व्यवसाय सांभाळून जोडधंद्याच्या साह्याने आपल्या नेहमीच्या मिळकतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवत आहेत.

स्पीड अँण्ड स्पार्कया बिझनेस मॉडेलतंर्गत इच्छुकांना एक सॉफ्टवेअर दिले जाते. याद्वारे त्यांना उद्योगासंबंधी मार्गदर्शन केले जाते. तसेच आपला उद्योग किती कार्यक्षम पद्धतीने आणि आर्थिकदृष्ट्या कितपत योग्य रितीने सुरू आहे किंवा नाही, हेदेखील संबंधितांना जोखता येते. एकूणच हे मॉडेल अनेकांना कमी कष्टात आणि झटपट पैसे मिळवून देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

(प्रायोजित)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2017 12:36 pm

Web Title: try speed n spark model to earn fast and easy money
Next Stories
1 ‘पीएफ’ लाभ अंशत: म्युच्युअल फंडाच्या युनिट्सच्या रूपात!
2 वित्तीय तूट विस्तारण्याचा धोका!
3 अर्धा ते एक टक्का व्याजदर कपातीचा उद्योग जगताचा आग्रह
Just Now!
X