भारती एंटरप्राईजेसबरोबरची सहा वर्षांची व्यावसायिक भागीदारी संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकी वॉलमार्टला तब्बल ३३.४ कोटी डॉलरची किंमत मोजावी लागली आहे. कर्ज आणि समभाग खरेदीपोटी वॉल-मार्टला ही रक्कम भरावी लागली आहे. भारतात किराणा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीचे चित्र किचकट बनल्यानंतर अमेरिकी वॉलमार्टने भारतीबरोबरची भागीदारी ऑक्टोबर २०१३ मध्ये संपुष्टात आणली होती. यानंतर भारतात स्वतंत्ररित्या व्यवसाय करण्याचे धोरण वॉलमार्टने आखले. कर्ज, दायित्वाची रक्कम म्हणून वॉलमार्टला २३.४ कोटी डॉलर द्यावे लागले आहेत, तर उर्वरित १० कोटी डॉलर हे भारतीबरोबरच्या व्यवसाय भागीदारीतून हिस्सा काढून घेण्यासाठी द्यावे लागले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2014 रोजी प्रकाशित
३३ कोटी डॉलरचा वॉलमार्टला भुर्दंड
भारती एंटरप्राईजेसबरोबरची सहा वर्षांची व्यावसायिक भागीदारी संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकी वॉलमार्टला तब्बल ३३.४ कोटी डॉलरची किंमत मोजावी लागली आहे.

First published on: 29-04-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 crore dollar penalty to walmart