उच्च गुणवत्तेची आयुर्वेदिक आणि वनौषधी उत्पादनांचे किफायती दरात विक्रीच्या आधुनिक दालनांची शृंखला कपिवा आयुर्वेद या नावाने देशभरात सुरू करण्याची योजना बैद्यनाथ समूहाने आखली आहे. अलीकडेच यातील पहिले दालन घाटकोपर, मुंबई येथे सुरू झाले. नजीकच्या काळात मुंबई आणि दिल्लीत अशी २५ विक्री दालने सुरू करण्याची योजना असल्याचे तिचे दोन संस्थापक अमीव शर्मा आणि श्रेय बाधनी यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्ती तिच्या शारीर प्रकृतीनुरूप अनोखी उपचार पद्धती यावर बेतलेली संकल्पना म्हणजे कपिवा (कफ-पित्त-वात) असे या विक्री शृंखलेच्या नावाची उकल त्यांनी केली. कपिवामध्ये बैद्यनाथ, हिमालया, डाबर यांची अस्सल आयुर्वेदिक औषधी, ऑरगॅनिक इंडिया, कॉन्शियस फूड्स, पतंजली, बायोटिक आणि खादी यांचे नैसर्गिक खाद्य, हर्बल सौंदर्य आणि व्यक्तिगत निगा उत्पादने उपलब्ध असतील.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
बैद्यनाथ समूहाची देशभरात ‘कपिवा आयुर्वेद’ विक्री केंद्रांची योजना
उच्च गुणवत्तेची आयुर्वेदिक आणि वनौषधी उत्पादनांचे किफायती दरात
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 04-05-2016 at 07:13 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baidyanath ayurved plans to set up kapiva ayurveda store