रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी चालू आर्थिक वर्षातील अखेरच्या तिमाहीतील पहिल्या पतधोरणात रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केल्यानंतर आता सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बॅंका गृह कर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात वाढ करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला असताना यासंदर्भात परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे बॅंकांनी जाहीर केले.
रेपो दरात बदल केल्यामुळे चलनवाढ आणि ठेवींवर काय परिणाम होतो, हे बघितल्यानंतरच कर्जावरील व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे देशातील प्रमुख बॅंकांनी स्पष्ट केले.
स्टेट बॅंकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, बॅंकेच्या व्यवस्थापकीय मंडळाची मंगळवारी संध्याकाळी बैठक होत असून, त्यामध्येच ठेवींवरील आणि कर्जावरील व्याजदराबाबत निर्णय घेतला जाईल. ठेवीदार आणि कर्जदार या दोन्हींचा सारासार विचार करूनच बॅंकेला व्याजदर वाढीचा निर्णय घ्यावा लागेल.
व्याजदर वाढीबाबत इतक्या घाईने काही सांगता येणार नाही. चलनवाढ आणि ठेवींच्या आघाडीवर पुढे काय घडते, याकडे लक्ष ठेवावे लागेल. त्यानंतरच व्याजदर वाढ करायची का, याचा निर्णय घेता येईल, असे आयसीआयसीआय बॅंकेच्या चंदा कोचर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
परिस्थिती पाहून निर्णय घेऊ – व्याजदरवाढीसंदर्भात बॅंकांची भूमिका
रेपो दरात बदल केल्यामुळे चलनवाढ आणि ठेवींवर काय परिणाम होतो, हे बघितल्यानंतरच कर्जावरील व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे देशातील प्रमुख बॅंकांनी स्पष्ट केले.
First published on: 28-01-2014 at 06:16 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banks to wait a while for trends before hiking lending rates