‘झूम’कडून निधी हस्तांतरण सुविधा
मुंबई : अमेरिकेतील सर्वात मोठी डिजिटल निधी हस्तांतरण सुविधा असलेल्या झूम कॉर्पोरेशनने आपल्या परदेशस्थ ग्राहकांना भारतातील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात विनाविलंब निधी जमा करण्याची सुविधा प्रदान केली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी झूमने पंजाब नॅशनल बँकेचे सहकार्य मिळविले आहे. ‘आयएमपीएस’ तंत्रज्ञानावर आधारित अशा सुविधा झूमने यापूर्वी पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा फेडरल बँक आणि येस बँकेबरोबर याच धर्तीचे सामंजस्य केले आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही चार तासांच्या अवधीत या बँकांच्या खात्यांमध्ये इच्छित रक्कम जमा करण्याची सुविधा झूमने देऊ केली आहे.
‘ब्रिजस्टोन’चे कोटीचे योगदान
मु्ंबई : जगातील सर्वात मोठी टायर आणि रबर कंपनी ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनची उपकंपनी असलेल्या ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने जम्मू आणि काश्मिर येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहायता निधीमध्ये एक कोटी रुपयांचे योगदान देत असल्याचे जाहीर केले आहे. उपरोक्त रकमेचा धनादेश पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीमध्ये ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक अजय सेवेकर यांनी पंतप्रधान कार्यालयास सुपूर्द केला. याद्वारे पुराचा फटका बसलेल्याांच्या मदतीसाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनर्बाधणीसाठी हे योगदान दिले गेले आहे.
‘एडेलविस टोकियो लाईफ इन्शुरन्स’चे सर्व फंड पंचतारांकित
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />एडेलविस फायनान्शियल सíव्हसेस लिमिटेडची आयुर्विमा कंपनी असलेल्या एडेलविस टोकियो लाईफ इन्शुरन्सच्या सर्व वैयक्तिक यूलिप फंडांना प्रतिष्ठित मॉर्निगस्टारने पंचतारांकित म्हणून मानांकित केले आहे. सर्व सहा अशा फंडांना हा दर्जा मिळणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.
गुंतवणुकीच्या विविध टप्प्यासाठी मॉìनगस्टार एक ते पाच स्टापर्यंत मानांकन प्रमाणित करते. एक स्टार म्हणजे कमी दर्जाचा क्रमांक व पाच स्टार म्हणजे सर्वात उत्कृष्ट दर्जाचा क्रमांक असे समजले जाते. पंचतारांकित मानांकन मिळालेले फंड हे इक्विटी, डेब्ट, पी/ई इत्यादींसारख्या विशिष्ट मालमत्ता विभागांमधील उच्च प्रतिसाद म्हणून फंडांना निर्देशित करतो. मानांकनासाठी तीन वष्रे पूर्ण झालेले फंड केवळ गृहित धरले जातात. याबाबत एडेलविस टोकियो लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मित्तल यांनी सांगितले की, विभागामधील ५०० ग्रा’ा फंडांपकी केवळ १० टक्के फंडांना पंचतारांकित म्हणून प्रमाणित करण्यात आले.