नवे विप्रो ‘सीईओ’ महत्त्वाकांक्षी!
देशातील तिसऱ्या मोठय़ा माहिती तंत्रज्ञान कंपनीची धुरा घेण्यासाठी सज्ज असलेल्या विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबिदाली नीमुचवाला यांनी अधिक महत्त्वाकांक्षी होण्यासाठी कंपनी लवकरच काही धोरणात्मक आराखडे आखणार असल्याचे सुतोवाच केले. सोमवारी कंपनीच्या चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांनिमित्ताने मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. कुरियन यांच्या उपस्थितीत नव्या मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या १ फेब्रुवारीपासूनच्या कार्यपद्धतीची चुणूकच याद्वारे दाखविली. कंपनीने गेल्या तिमाहीत नफ्यातील अवघी २ टक्के वाढ नोंदविली आहे.
शॉपक्लूज एक अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील
मुंबई : भारतातील व्यापक व्यवस्थापन बाजारपेठ शॉपक्लूजने श्रेणी नवीन निधी उभारला असून शॉपक्लूजचे मूल्यांकन एक अब्ज डॉलरच्या घरात पोहोचले आहे. सिंगापूरच्या सॉवराईन वेल्थ फंड जीआयसीने या गुंतवणूकदारांच्या समूहाचे नेतृत्व केले आहे. टायगर ग्लोबल व नेक्सस व्हेंचर्स पार्टनर्स यांनीदेखील शॉपक्लूजमध्ये गुंतवणूक केली आहे. जानेवारी २०१५ मध्ये कंपनीचे मूल्यांकन ३५ कोटी डॉलर होते. सध्या शॉपक्लूजचे मूल्यांकन १.१ अब्ज डॉलर झाले आहे.
लॉजीनेक्स्ट सोल्युशन्स सीआयओ चॉईसचा मान
मुंबई : मालवाहतूकदार कंपन्यांना विविध क्षेत्रात तत्काळ दृश्यमानता, प्रचंड मोठी माहिती विश्लेषण सुविधा आणि उत्पादन समन्वय पुरविण्याचे काम करणाऱ्या लॉजीनेक्स्ट सोल्युशन्सला ’सीआयओ चॉईस २०१६’ ने सन्मानित करण्यात आले. सीआयओ चॉईस २०१६ चे विजेते देशभर घेण्यात आलेल्या एका स्वतंत्र सीआयओ मतदान सर्वेक्षणातून निवडण्यात आले. उत्पादनाची कामगिरी, ग्राहक समाधान आणि सातत्यपूर्ण ग्राहक सेवा या निकषांवर ही निवड करण्यात आली. हे सीआयओच्या विश्वासाचे द्योतक आणि समर्थन आहे, कारण हे ‘सीआयओना सीआयओ’द्वारे बहाल करण्यात आलेले आहे.
’केयर२४’ची ४० लाख डॉलरची निधी उभारणी
मुंबई : मुंबईतील सर्वाधिक वेगाने वाढणारी गृह आरोग्यनिगा सेवा पुरवठादार ’केयर२४ ने सफ पार्टनर्सच्या नेतृत्वाखाली आणि सीड गुंतवणूकदार इंडिया कोशंटच्या पाठींब्याने उभारलेल्या निधीची घोषणा आज केली. केयर२४ला सीड फंिडग प्राप्त केल्यानंतर ३ महिन्यांच्या आत ४० लाख डॉलरचा हा ताजा निधी मिळाला आहे. या निधीचा वापर सुरुवातीला मुंबई लगतच्या परिसरात आपला प्रभाव वाढविण्यासाठी, उत्तम आणि गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाईल. केयर 24 येत्या तीन महिन्यांत या क्षेत्रातील मुंबईतील सर्वात मोठी कंपनी बनण्याच्या दिशेने अग्रेसर आहे आणि ती भारतातील इतरही शहरांत आपला विस्तार वाढविण्याचा प्रयत्न करेल, असा दावा करण्यात आला आहे.
मराठी बिझनेस क्लबद्वारे उद्योजक सन्मानीत
मुंबई : मराठी बिझनेस क्लब (एमबीसी) या मराठी उद्योजकीय संस्थेचा पाचवा वर्धापन दिन दादर येथील सावरकर सभागृहात नुकताच पार पडला. या वर्धापन दिनी सोहळ्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून क्विकहील टेक्नॉलॉजिझचे अध्यक्ष कैलाश काटकर तसेच मराठी व्यवसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष अनंत भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात रक्षक ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, स्टील आणि लाकडी फíनचरचे उत्पादक विजयकुमार माळवदकर, शाहू बॅंकेचे संस्थापक अर्जुन आहेर पाटील, संपूर्ण भारताला फिरते शौचालय पुरविणारे धनंजय बेळे, सात वेळा ‘मिस्टर इंडिया’, एकदा ‘मिस्टर युनिवर्स’, ‘मिस्टर वर्ल्ड’ असा खिताब मिळविणारा विख्यात शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले आदींचा ‘एमबीसी उद्योगतारा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबईतील अंबानी रुग्णालयाला पुरस्कार
मुंबई : जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (जेसीआय) ने कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलला ‘यूएसए गोल्ड सील ऑफ एॅप्रुव्हल’ने सन्मानित केले आहे. कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलला डिसेंबर २०१५ मध्ये अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि पूर्ववर्ती भागांमधून घेतलेल्या शिष्टाचारांवर आंतरराष्ट्रीय तज्ञ समितीद्वारे घेतल्या गेलेल्या सर्वेक्षणाला सामोरे जावे लागले. हे मूल्यांकन प्रभावी क्लिनिशियन आणि आंतर्गत शिष्टता संघकार्याशी संबंधित असलेल्या समस्यांना आंतर्भूत करत असून त्यामुळे रुग्णाच्या दर्जाला आणि सुरक्षेला केंद्रस्थानी घेऊन रुग्णाच्या घेतल्या काळजीतील समन्वय आणि व्यापकतेची खात्री देते, असा दावा करण्यात आला आहे. जॉइंट कमिशन इंटरनॅशनल तीन वर्षांच्या कालावधीसाठी दिले जात असून ते मानक सुनिश्चित करते.