रविवारी सकाळी ‘लोकसत्ता अर्थभान’चे तिसरे सत्र
मुंबई : भांडवली बाजारातील धडकी भरवणारे चढ-उतार, सोने आणि गृहनिर्माण क्षेत्रातील मंदावलेले भाव आणि बँकांचे खाली येणारे व्याजदर यामुळे म्युच्युअल फंडाकडे सुरक्षितता व स्थिरता म्हणून गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढले आहे. गरज, उद्दिष्टानुरूप अपेक्षा आणि जोखीम घेण्याच्या तयारीप्रमाणे म्युच्युअल फंडाकडून उपलब्ध अनेकविध योजनांतून नेमकी निवड कशाची करायची, यासंबंधीचे मार्गदर्शन येत्या रविवारी ‘लोकसत्ता अर्थभान’ मालकीच्या तिसऱ्या सत्रात केले जाणार आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ या अर्थसंकल्पोत्तर गुंतवणूकदार जागराच्या मालिकेतील पुढील सत्रात ‘म्युच्युअल फंड झ्र् विनागुंता गुंतवणूक’ या विषयावर चर्चा होणार आहे. हा दूरचित्रसंवाद माध्यमातून होणारा कार्यक्रम येत्या रविवारी, २० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.
गुंतवणूक करताना मागील कामगिरी बघून गुंतवणूक करण्याची मानसिकता दिसून येते. भूतकाळात जी कामगिरी झालेली आहे, तशीच ती भविष्यात होईल, याची खात्री नसते. यामुळेच गुंतवणूक करताना नक्की गरज व जोखीम या गोष्टींचा विचार करून गुंतवणूक करणे कसे आवश्यक आहे, याचे मार्गदर्शन गुंतवणूकविषयक अभ्यासक आणि स्तंभलेखक वसंत कुळकर्णी यानिमित्ताने करतील.
गुंतवणूक एकरकमी करणे योग्य की सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) करावी याबद्दलही ते मांडणी करतील.
महिनागणिक देशातील म्युच्युअल फंड उद्योगाच्या गंगाजळीत निरंतर वाढ सुरू असून, जानेवारीत त्याने ३८ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. म्यु्च्युअल फंडातील नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’ खात्यांनी ऐतिहासिक पाच कोटींपुढे मजल मारली आहे. हे या गुंतवणुकीचे वाढते आकर्षण सुजाणतेने आहे काय आणि सुज्ञपणे निवडीचे निकष कोणते या मुद्दय़ांवर नियोजित हे दिशादर्शन सर्वासाठी उद्बोधक ठरेल.
सहभागासाठी..
वाचकांना http:// tiny. cc/ LS_ Arthabhan_20 Feb या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक ठरेल अथवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी करता येईल.
विषय : म्युच्युअल फंड – विनागुंता गुंतवणूक
मार्गदर्शक : वसंत कुळकर्णी
कधी : रविवार, २० फेब्रुवारी
वेळ : सकाळी ११ वाजता