नव्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यापाराने लघुउद्योजक, छोटे-मोठे निर्माते, आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठय़ा संधीचे दालन खुले केले आहे. परंतु या ई-व्यापारासाठी आवश्यक गुणविशेष, त्यातील खाचखळगे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने ‘इंडियन ऑनलाइन सेलर्स’ या मंचाने ई-व्यापाराच्या भरारीत नवउद्योजकांना सहभाग देणारे पंख प्रदान करणाऱ्या कार्यशाळेचे शनिवार, २१ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून के. जे. सोमय्या इंजिनीयरिंग कॉलेज सभागृह, विद्याविहार (पूर्व) येथे आयोजन केले आहे. सहभागासाठी http://www.indianonlineseller.com या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. कार्यशाळेत व्यवसायाचा ढाचा, परिचालनात्मक पैलू, किमती आदी उद्योगांतील बारकाव्यांवर भर दिला जाईल.