आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,७५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६८,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६८९ रुपये आहे.

beaches, machines, Raigad, beach,
समुद्र किनाऱ्यांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता होणार, चार अत्याधुनिक मशिन्स रायगडमध्ये दाखल
sangli almatti dam marathi news,
Video: सांगलीत पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टीच्या विसर्गामध्ये २५ हजार क्युसेकची वाढ
dengue alert What to watch out for to avoid severe infection How to prevent severe dengue dengue fever causes symptoms & treatment
महाराष्ट्र, केरळसह ‘या’ राज्यांत डेंग्यूचा ‘ताप’; गंभीर संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? वाचा डॉक्टरांचा सल्ला…
shortage of oncologists in maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात कर्करोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या तुटवड्याची कारणे काय? यातून कोणत्या समस्या?
pooja khedkar audi challans
IAS Pooja Khedkar यांच्या कारने वाहतुकीचे तब्बल २१ नियम मोडले, २७ हजारांची दंडवसुली थकित
Pune, Pune Excise Depart, Excise Department Busts more than 1 Crore Liquor Smuggling, Liquor Smuggling through Cosmetic Boxes, Liquor Smuggling, pune news, latest news, loksatta news,
सौंदर्य प्रसाधनाच्या खोक्यांतून गोव्यातील मद्याची तस्करी, एक कोटी २८ लाखांच्या मद्यसाठा जप्त
Poor quality of 15 road works in Pimpri Chief Minister Eknath Shinde confession
पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
manoj jarange in parbhani
“इतक्या जोमाने एसटी आरक्षणासाठी लढले असते, तर…”; मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना टोला!

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.