सार्वजनिक क्षेत्रातील हुडको कंपनीतील १० टक्के हिस्साविक्रीस केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. मार्च २०१५ अखेर ७,८०० कोटी रुपये् निव्वळ मालमत्ता असलेल्या हुडकोचे भाग भांडवल २,००१.९० कोटी रुपयांचे आहे. कंपनीच्या प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे.