आयसीआयसीआय बँकेने कार्बन क्रेडिट कार्डची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँक कार्बनमध्ये, ईएमव्ही चिप टेक्नॉलॉजीसह विसा कोडशुअरची सुविधा असून कोणत्याही वापरासाठी विशेषत: ऑनलाईन शॉपिंगसाठी ते सुरक्षित आहे. आशियातील अशा प्रकारचे हे पहिलेच क्रेडिट कार्ड आहे.कार्डच्या प्लॅस्टिकवर अल्फा- न्युमरिक एलसीडी स्क्रीन, 12 बटनांचे टच किपॅड आणि एकाच वेळेसाठी जलद पासकोडनिर्मितीसाठी अंगभूत बॅटरीची सुविधा आहे.
या कार्डचा वापर करण्यासाठी, वापराआधी कार्डधारकाला सुरुवातीला आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर कोडशुअर पीन (पीआयएन) निर्माण करणे आवश्यक आहे. ही एकाच वेळेची कृती आहे. या कोडशुअर पीनचा वापर करून, कार्डधारक प्लॅस्टीक कार्डवर तात्काळ वन-टाईम पासकोडची (ओटीपी) निर्मिती करू शकतो. कार्डच्या पाठीमागील डिस्प्ले पॅनेल, नंतर हा ओटीपी दाखवतो आणि त्याचा ऑनलाईन व्यवहाराची सत्यता पडताळण्यासाठी उपयोग होतो. याचा अर्थ, कोडशुअर पीन आणि ओटीपी शिवाय कोणताही व्यवहार पूर्ण होत नसल्यामुळे एखादा बनावटमार्गाने कार्डपर्यंत पोहचू शकला तरी कार्ड सुरक्षित आहे. याशिवाय, ग्राहकाकडून कार्ड हरवले तरी, कोडशुअर पीन प्रत्येक ग्राहकासाठी वेगळा असल्यामुळे कार्डवरून व्यवहार होऊ शकत नाही.