पर्यटन क्षेत्रामध्ये यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सहल आयोजनातील अग्रणी ‘केसरी’ प्रशिक्षणाचीही सोयही केली आहे. केसरीतर्फे सुरू झालेल्या ‘केसरी ट्रॅव्हल अ‍ॅकॅडमी’मार्फत कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा १२ वी उत्तीर्णासाठी ‘सर्टिफिकेट कोर्स इन ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम’ या नऊ महिन्याच्या प्रशिक्षणक्रमाची पहिली तुकडी जुलैमध्ये सुरू होत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना केसरीसोबत काम करण्याची संधी मिळेल. अधिक तपशिलासाठी या केसरीच्या http://www.kesari.in  वेबस्थळावर जाता येईल.  

‘एमटीएनएल’कडून विविध समाजघटकांसाठी सवलतीत जोडणी
 दूरसंचार क्षेत्रातील सरकारी उपक्रम असलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात ‘एमटीएनएल’ने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून विविध समाजघटकांना सवलतीत जोडणी तसेच मासिक शुल्कात कपातीची योजना घोषित केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना (वय वर्षे ६५ व त्यावरील) जोडणी शुल्क व मासिक शुल्कात २५% सवलत, सरकारी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था तसेच वृद्धाश्रम, अनाथालय, विशेष मुलांसाठी कार्यरत संस्थांमधील निवासी दूरध्वनीसाठी जोडणी शुल्क व मासिक शुल्कात २५% सवलत त्याचप्रमाणे अंध व्यक्ती, युद्धात मृत जवानांच्या विधवा, जायबंदी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांना कोणतेही जोडणी शुल्क न आकारता मासिक शुल्कात ५०% सवलत प्रदान केली जाते. शौर्य पुरस्कारप्राप्त, राष्ट्रपती पदक, पोलीस पदकप्राप्त सुरक्षादलातील सेवकांना कोणतेही जोडणी वा मासिक शुल्काविना एमटीएनएलकडून दूरध्वनी सेवा प्रदान केली जाते.

सौरऊर्जा उद्योगातील नव-तंत्रज्ञानाचे मुंबईत प्रदर्शन
स्वच्छ व किफायती ऊर्जा पर्याय म्हणून सौरऊर्जानिर्मितीकडे जगभरात वाढता कल दिसून येत असून, भारत सरकारनेही २०१० साली ‘नॅशनल सोलर मिशन’ला सुरुवात करून सौरऊर्जा क्षेत्रात वेगाने प्रगतीचा आलेख आखला आहे. या गतिमान उद्योग क्षेत्रात नवनवीन तंत्र आणि तंत्रज्ञानाची दिवसागणिक भर पडत असून या तंत्रज्ञानात्मक बदल आणि नवनव्या आधुनिक उपकरणांची ओळख ‘इंटरसोलर इंडिया २०१३’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून घडणार आहे. येत्या १२ ते १४ नोव्हेंबर २०१३ दरम्यान हे प्रदर्शन गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुलात होत असून प्रदर्शनात ३०० हून अधिक उत्पादक व सेवाप्रदाते हजेरी लावतील, तर ८५०० प्रेक्षकांनी भेट दिली जाणे अपेक्षित आहे. या क्षेत्रातील ७०० हून अधिक तज्ज्ञ प्रदर्शनाच्या निमित्ताने होणाऱ्या तंत्रज्ञानाविषयक चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एच. बी. पन्तौला सेंट्रल बँकेच्या पुणे क्षेत्राचे नवे व्यवस्थापक
पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे पुणे क्षेत्राचे व्यवस्थापक म्हणून एच. बी. पन्तौला यांची नियुक्ती झाली आहे. या पदाचा कार्यभार सांभाळत असलेले बी. एस. शेखावत यांना बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात पदोन्नती मिळाल्यामुळे रिक्त झालेल्या जागी पन्तौला रुजू होत आहेत. बँकिंग क्षेत्रातील विस्तृत अनुभव गाठीशी असलेले ५६ वर्षीय पन्तौला या आधी इंदूरमध्ये बँकेच्या दुर्गापूर विभागात वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सेंट्रल बँकेच्या पुणे क्षेत्रात मोडणारे १७ जिल्हे आणि २३७ शाखांची जबाबदारी पन्तौला यांच्यावर असेल.