सुरुवातीचे नुकसान भरून काढतानाच मंगळवारच्या तुलनेत एक पैशाने वधारलेल्या रुपयाने बुधवारी सप्ताह तळातून बाहेर येण्याचा यशस्वी प्रयत्न केला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ६०.१३ वर स्थिरावले. ६०.२३ या किमान स्तरावर दिवसाचा प्रवास सुरू करणारा रुपया दिवसअखेर चलन व्यवहारातील उच्चांकी स्थितीवर स्थिरावला. रुपयाचा ६०.३८ हा सप्ताह नीचांक राहिला आहे.
सोने-चांदी दर सुखावले
सराफा बाजारात बुधवारी मौल्यवान धातूंचे दर काही प्रमाणात खाली आले. शहरात स्टॅण्डर्ड सोने तोळ्यामागे १९५ रुपयांनी कमी होत २८,१५५ रुपयापर्यंत घसरले. तर चांदीचा दरदेखील बुधवारी एकदम किलोसाठी ४९० रुपयांनी खाली येत त्याला ४५ हजारांपर्यंतचा भाव मिळाला. चांदीचा दर गेल्या काही दिवसांत कमालीचा उंचावला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2014 रोजी प्रकाशित
बाजार: रुपया सप्ताह नीचांकीतून बाहेर
सुरुवातीचे नुकसान भरून काढतानाच मंगळवारच्या तुलनेत एक पैशाने वधारलेल्या रुपयाने बुधवारी सप्ताह तळातून बाहेर येण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
First published on: 26-06-2014 at 01:36 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian rupee down 19 paise against us dollar