पवन ऊर्जा क्षेत्रातील आयनॉक्स विंड लिमिटेडने गुरुवारी भांडवली बाजारात दमदार पाऊल टाकले आणि मरगळत चाललेल्या प्राथमिक बाजारात आजही धमक शिल्लक असल्याचा प्रत्यय दिला.
दोन आठवडय़ांपूर्वी प्रत्येकी ३२५ रुपयांनी सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांना मिळविलेल्या कंपनीच्या समभागाचे शेअर बाजारात नोंदणी होताच सकाळच्या व्यवहारात ४०० रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले.
त्यानंतरच्या व्यवहारात तो ४४७.८० रुपयांपर्यंत झेपावला. तर त्याचा दिवसाचा तळही ४०० रुपयांनजीकच होता. दिवसअखेर समभाग वितरीत किमतीच्या तब्बल ३४.७६ टक्क्य़ांनी उंचावत ४३८ रुपयांवर स्थिरावला. गेल्या काही वर्षांत भागविक्रीतून गुंतवणूकदारांना भरभरून लाभ मिळणे दुरापास्त झाले असून, ‘आयनॉक्स विंड’ची पदार्पणातील कामगिरी त्यामुळे चमकदार ठरली आहे.
गुरुवारी मुंबई शेअर बाजारात ११३ लाख तर राष्ट्रीय शेअर बाजारात तिच्या ३ कोटी समभागांचे व्यवहार झाले. कंपनीने ७०० कोटी रुपयांची प्रारंभिक खुली विक्री घोषित केल्यानंतर २० मार्च रोजी संपलेल्या या प्रक्रियेला १८ पट प्रतिसाद मिळाला होता.
जून २०१३ नंतरची ही सर्वात मोठी भाग विक्री प्रक्रिया होती. यापूर्वी जस्ट डायलने भांडवली बाजारातून ९१६ कोटी रुपये उभारले होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘आयनॉक्स विंड’चे दमदार पदार्पण
पवन ऊर्जा क्षेत्रातील आयनॉक्स विंड लिमिटेडने गुरुवारी भांडवली बाजारात दमदार पाऊल टाकले आणि मरगळत चाललेल्या प्राथमिक बाजारात आजही धमक शिल्लक असल्याचा प्रत्यय दिला. दोन आठवडय़ांपूर्वी प्रत्येकी ३२५ रुपयांनी सार्वजनिक प्रारंभिक विक्रीद्वारे गुंतवणूकदारांना मिळविलेल्या कंपनीच्या समभागाचे शेअर बाजारात नोंदणी होताच सकाळच्या …
First published on: 10-04-2015 at 01:55 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inox wind debuts at rs 400 a premium of 23 on nse