प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र न भरलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची मुदत दरवर्षी ३१ जुलैपर्यंत असते. यावेळी केंद्र सरकारने त्यामध्ये अगोदरच ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. मात्र, ३१ ऑगस्टपर्यंत अनेकानी प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्याने आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. करदाते आता या कालावधीपर्यंत ऑनलाईन विवरणपत्र भरू शकणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2015 रोजी प्रकाशित
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

First published on: 02-09-2015 at 04:34 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last date for filing income tax return extended till september