बाह्य प्रतिकूल घडामोडींचे सावट, वाढती महागाई, रुपयाचे उत्तरोत्तर अवमूल्यन आणि मंदीच्या भीतीने काळवंडलेल्या वातावरणाला भांडवली बाजाराने सोमवारी छेद दिला. सायंकाळी दिवाळीतील मुहूर्ताच्या विशेष व्यवहारात प्रमुख निर्देशांकांनी बहारदार तेजी दर्शवली आणि नव वर्ष (संवत्सर २०७९) हे मंगलदायी चैतन्याचे राहील असा आशावाद जागवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडवली बाजारातील परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजननिमित्त सोमवारी संध्याकाळी बाजारात तासाभरासाठी मुहूर्ताचे सौदे पार पडले. सेन्सेक्स ५२४.५१ अंशांनी झेप घेत व्यवहाराअंती ५९,८३१.६६ वर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १५४.५० अंशांची कमाई करून १७,७३०.८० वर जाऊन बंद झाला. दोन्ही मुख्य निर्देशांकांनी ०.८८ टक्क्यांची वाढ नोंदवली. एकंदर बाजारात खरेदीचा उत्साह जोरावर होता, परिणामी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई स्मॉलकॅप आणि बीएसई मिडकॅप या निर्देशांकांमध्येही अर्धा ते एका टक्क्याची वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सुमारे २,६०२ समभागांचे मूल्य वाढले, त्या तुलनेत ७२७ समभागांत घट झाली तर १५३ समभागांचे मूल्य अपरिवर्तित राहिले. नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँक हे निर्देशांकांतील मोठी वाढ साधणारे समभाग होते, तर नुकसान सोसलेल्या समभागांमध्ये हिंदूस्तान युनिलिव्हर, कोटक मिहद्र बँक, एचडीएफसी लाईफ आणि अदानी एंटरप्रायझेस यांचा समावेश होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market boom deal of the day year 2079 is with a rise in sensex nifty ysh
First published on: 25-10-2022 at 00:02 IST