म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांचा बँकिंग समभागांमधील ओढा कमालीचा वाढला असून, डिसेंबर २०१४ अखेर समभाग प्रकारातील (इक्विटी) योजनांच्या एकूण ३.३ लाख कोटींच्या गंगाजळीपैकी विक्रमी ७३,००० कोटी केवळ बँकांच्या समभागांत गुंतले आहेत.
eco05तथापि देशाच्या सॉफ्टवेअर आणि माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्राबद्दल म्युच्युअल फंडांचा कलही कमजोर होत असल्याचे दिसून येते. या क्षेत्रातील फंडांची गुंतवणूक नोव्हेंबर २०१४ मधील विक्रमी ३४,६७४ कोटींवरून घसरून, डिसेंबर २०१४ अखेर ३३,९७० कोटींवर आली आहे. साधारण महिनाभरातील ९०० कोटी रुपयांची घट ही नफा कमावण्यासाठी झालेल्या विक्रीच्या परिणामी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.