भारतीय बाजारपेठेत यश न मिळणे नेटफ्लिक्ससाठी निराशाजनक आहे अशे नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक, अध्यक्ष आणि सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांनी गुरुवारी एका गुंतवणूकदारांच्या संवादादरम्यान म्हटले आहे. कंपनी निश्चितपणे भारतात काम करत आहे असेही हेस्टिंग यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सने २०२१ च्या चौथ्या तिमाहीत आशिया आणि पॅसिफिक भागात २५.८ लाख नवीन सबस्क्रायबर जोडले आहेत. कोणत्याही एका तिमाहीत ग्राहकांच्या संख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. विशेषत: जपान आणि दक्षिण कोरियामध्ये त्याच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

नेटफ्लिक्ससाठी आशिया ही सर्वात लहान बाजारपेठांपैकी एक आहे. नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबरच्या बाबतीत सर्वात मोठी बाजारपेठ उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि नंतर युरोप आहे. नेटफ्लिक्सचे आशियामध्ये एकूण ३.२६ कोटी सबस्क्रायबर आहेत, जे त्याच्या एकूण सबस्क्रायबर संख्येच्या १४ टक्के आहे. नेटफ्लिक्सचे एकूण २२.१८ कोटी सबस्क्रायबर आहेत.

नेटफ्लिक्स आता आपली वाढ आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आशियासह इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही तिमाहीत नेटफ्लिक्सचे बहुतांश सबस्क्रायबर आशियामधून आले आहेत आणि जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कंपनीच्या यशाचे श्रेय याला दिले जाते.

नेटफ्लिक्सला जपान आणि दक्षिण कोरियामध्ये सारखेच यश मिळाले असले तरी भारतात मात्र अद्याप तेच यश मिळालेले नाही. नेटफ्लिक्ससाठी भारतीय बाजारपेठ अजूनही एक गूढ आहे आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचीही नेटफ्लिक्ससाठी कठोर स्पर्धा आहे.

नेटफ्लिक्सचे सह-संस्थापक रीड हेस्टिंग्स यांनी एका कॉन्फरन्स कॉलमध्ये याबाबत भाष्य केले आहे. “आम्ही जवळजवळ प्रत्येक मोठ्या बाजारपेठेत वेगाने वाढ करत आहोत. अशा परिस्थितीत, ही गोष्ट आम्हाला निराश करते की आपण भारतात इतके यशस्वी का नाही आहोत. नक्कीच आम्हाला इथे काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे,” असे रीड हेस्टिंग्स म्हणाले.

नेटफ्लिक्सने २०१६ मध्ये भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर, डिसेंबरमध्ये प्रथमच, त्यांच्या योजनेत मोठी कपात केली. नेटफ्लिक्सचा एंट्री लेव्हल प्लॅन आता १९९ रुपये प्रति महिना उपलब्ध आहे, जो पूर्वी प्रति महिना ४९९ रुपये होता. याशिवाय, कंपनीने अधिक युजर्स जोडण्यासाठी मोबाईल ओन्ली योजना देखील लॉन्च केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत आता प्रति महिना १४९ रुपये आहे.