जर्मनीतील दुग्ध उत्पादनातील आघाडीची कंपनी हॉचलँडचे प्रमुख उत्पादन अर्थात अॅल्मेट फ्रेश क्रीम चीझ भारतात यापुढे ‘गो अॅल्मेट’ या संयुक्त नाममुद्रेसह उपलब्ध होईल. या क्षेत्रातील पराग मिल्क फूड्स लिमिटेड या भारतीय कंपनीशी सामंजस्य करीत हा या धाटणीचा देशात पहिल्यांदाच प्रयोग सुरू होत आहे. जर्मनीतच हॉचलँडकडून उत्पादित केले जाणारे हे गायीच्या पाश्चराइज्ड दुधापासून बनविले जाणारे उत्पादन पराग मिल्क फूड्सशी को-बॅ्रण्डेड भागीदारीतून पहिल्यांदाच भारतात दाखल होत आहे. या भागीदारीत पराग मिल्क फूड्सची भूमिका ही प्रारंभी आयातदार आणि वितरक अशीच राहील.