सार्वजनिक बँकांप्रमाणेच देशातील खासगी क्षेत्रातील, विशेषत: अधिकारीपदाकरिता देशव्यापी संघटन मंच उपलब्ध झाला असून या मंचाने पदार्पणातच येत्या महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय संपात सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रायव्हेट सेक्टर बँक ऑफिसर्स फोरम’ (पीएसबीओएफ) चे नेतृत्व कोटक महिंद्र बँकेचे व्यंकटेश बाबू (अध्यक्ष), कर्नाटका बँकेचे के. राघवा आणि जेअॅन्डके बँकेचे सुरेश गुप्ता यांच्याकडे असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.
‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन’ (एआयबीओए) ने येत्या २ सप्टेंबर रोजी दिलेल्या एक दिवसीय देशव्यापी संपात नवी खासगी क्षेत्रातील अधिकारी वर्गाची बँक संघटना सहभागी होईल, असे देशातील दुसऱ्या मोठय़ा संघटनेचे सर चिटणीस एस. नागराजन यांनी म्हटले आहे.
कर्मचारी भरती, कंत्राटी नोकरभरती, प्रतिसादानुरूप भत्ते, कर सवलत आदी विषयांवर एआयबीओएचा संप होत आहे. हा संप एकदिवसीय असून देशव्यापी असेल.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2015 रोजी प्रकाशित
खासगी क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांनाही व्यासपीठ
सार्वजनिक बँकांप्रमाणेच देशातील खासगी क्षेत्रातील, विशेषत: अधिकारीपदाकरिता देशव्यापी संघटन मंच उपलब्ध झाला
First published on: 18-08-2015 at 08:26 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Platform for private sector bank officials