* सेन्सेक्स’ तीन महिन्याच्या खोलात;
* निफ्टी’ने ५,७०० स्तर सोडला
जागतिक शेअर बाजारात नरमाईचे वातावरण असूनही केवळ नफेखोरीच्या हिरिरिने गुंतवणूकदारांनी आठवडय़ाच्या सुरुवातीला समभागांची जोरदार विक्री केली. यामुळे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ‘सेन्सेक्स’ ४०.५६ अंश घसरणीसह १८,८७७.९६ पर्यंत खाली आला. प्रमुख शेअर बाजाराचा हा गेल्या तीन महिन्याचा तळ आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’देखील २१.२० अंश नुकसानामुळे ५,६९८.५० पर्यंत घसरला आहे. मुंबई निर्देशांकाने २७ नोव्हेंबरनंतरची पातळी गाठली तर निफ्टीनेह त्याचा ५,७०० चा स्तरही आज सोडला.
नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सेन्सेक्स सकाळी अर्धशतकी तेजीची वाटचाल करत होता. मात्र अवघ्या तासाभरातच त्याने १२५ हून अधिक अंशांची घसरण नोंदविली. यामुळे मुंबई निर्देशांक १८,८०० च्याही खाली आला. दिवसअखेर त्यात सुधारणा आली असली तरी निर्देशांक एकूण नकारात्मक स्थितीतच बंद झाला. तर मुंबई निर्देशांक यापूर्वी २७ नोव्हेंबर रोजी समकक्ष होता. तीन महिन्यांपूर्वी तो १८,८४२.०८ वर होता.
भांडवली बाजारात आज गुंतवणूकदारांनी पोलाद, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांच्या विक्रीचा मारा केला. एकूणच स्मॉल कॅप आणि मिड कॅपही आाज दीड टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरले होते. तर सेन्सेक्समधील जिंदाल स्टील, हिंदाल्को, टाटा स्टील, स्टरलाईट यांनी ५ टक्क्यांपर्यंतची घट नोंदविली होती. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अॅन्ड टुब्रो, मारुती सुझुकीच्या समभागातील घट ही २ टक्क्यांपर्यंतची होती. क्षेत्रीय निर्देशांकाच्या बाबत १३ पैकी १२ निर्देशांक आपटले होते.
वधारणाऱ्या कंपनी समभागांमध्ये आयटीसी, टीसीएस, बारती एअरटेल यासारखे समभाग राहिले. बँक समभागांनीही मूल्यांमध्ये भर नोंदविली. रिझव्र्ह बँक येत्या पतधोरणात व्याजदर कपात करण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील समभागांना पसंती दिली. व्याजदर कपातीसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यापूर्वीच अनुकूलता दर्शविली आहे. मध्यवर्ती बँकेचा आगामी मध्य तिमाही पतधोरण आढावा महिनाअखेर जाहीर होणार आहे. त्यात यंदा किमान पाव ते अध्र्या टक्क्याच्या व्याजदराची कपात अपेक्षित आहे. महागाई दर नरम होत असताना त्याची शक्यता अधिक दाट होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2013 रोजी प्रकाशित
सप्ताहारंभी नफेखोरी!
* सेन्सेक्स’ तीन महिन्याच्या खोलात; * निफ्टी’ने ५,७०० स्तर सोडला जागतिक शेअर बाजारात नरमाईचे वातावरण असूनही केवळ नफेखोरीच्या हिरिरिने गुंतवणूकदारांनी आठवडय़ाच्या सुरुवातीला समभागांची जोरदार विक्री केली. यामुळे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ‘सेन्सेक्स’ ४०.५६ अंश घसरणीसह १८,८७७.९६ पर्यंत खाली आला.

First published on: 05-03-2013 at 02:40 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profit makeing from firstday of week