पॉस यंत्रावर क्युआर कोड; अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने इनोव्हिटीतर्फे नवीन यंत्रणा

किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानात गेल्यावर अनेक ठिकाणी क्युआर कोड दिसतो. तो स्कॅन करून संबंधित अ‍ॅपच्या माध्यमातून आपण दुकानदाराला पैसे जमा करू शकतो. पण आता हाच क्युआर कोड ‘पॉस’ यंत्रामध्ये येणार आहे. यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेज (यूपीआय) आधारीत ‘भिम’ किंवा इतर बँकांच्या यूपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून पासवर्ड वगळता कोणतीही माहिती न भरता क्युआर कोड स्कॅनकरून पैसे जमा करता येऊ शकणार आहे.

इनोव्हिटी या कंपनीने अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने ही यंत्रणा तयार केली आहे. ही यंत्रणा रिलायन्स रिटेलच्या दुकांनामध्ये बसविण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून रिलायन्स रिटेलच्या दुकानांमध्ये युपीआय आधारीत पैसे भरण्याची यंत्रणा उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला मुंबईतील २०० दुकांनांमध्ये ही सुविधा सुरू होणार असून येत्या काळात देशभरातील सर्व दुकानांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच एक महिना ही सेवा वापरणाऱ्यांना त्यांनी भरलेल्या एकूण रक्कमेच्या पाच टक्के रोकड परतावा केला जाणार आहे. ही सुविधा रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स ट्रेंड्स आणि रिलायन्स फुटिपट्र्स या दुकानांमध्ये असेल असे रिलायन्स रिटेलचे संचालक व्ही. सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.

रिटेलमध्ये रोकडरहित व्यवहारांचा वापर करण्यास वेगवान चालना देण्याच्या उद्देशाने नव्याने विकसित झालेल्या यंत्रणेचा फायदा देशातील सर्व कार्ड पेमेंट स्वीकारणाऱ्या सर्व दुकानदारांना यूपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध करून देता येणार असल्याचे एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी ए. पी. होटा यांनी सांगितले.

नवी यंत्रणा कशी काम करते

  • ही नाविन्यपूर्ण क्यू- आर कोड आधारित सुविधा सध्या कार्यरत असेलले क्रेडिट/डेबिट कार्ड ‘पॉस’ टर्मिनल वापरून यूपीआय आधारित रोकडरहित व्यवहार करू शकते.
  • ग्राहकाने यूपीआय पेमेंट माध्यमाची विनंती केल्यानंतर दुकानदाराला त्याच्या सध्या वापरात असलेल्या ‘पॉस’ टर्मिनलवर यूपीआय पेमेंट हा पर्याय निवडून संबंधित रक्कम टाकावी लागेल. ही रक्कम टाकल्यानंतर स्क्रीनवर क्यू-आर कोड तयार होतो, जो ग्राहक वापरत असलेल्या यूपीआय अ‍ॅप्सद्वारे स्कॅन केला जाऊ शकतो.
  • स्कॅन केल्यानंतर क्यू-आर कोड संबंधित व्यवहारांचे तपशीला ग्राहकाच्या पेमेंट अ‍ॅपवर झळकवतो.
  • एकदा ग्राकाच्या यूपीआय-िलक्ड बँक खात्यावरून दुकानाच्या यूपीआय िलक्ड खात्यावर पसे विक्रत्याच्या नावे जमा झाले की पॉस टर्मिनल व्यवहार पूर्ण झाल्याची पावती िपट्र करते.