देशातील निर्मित क्षेत्राची वाढ ही गेल्या आठ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. निक्की इंडियाचा मार्चतील निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक ५२.४ टक्क्य़ांवर गेला आहे.
फेब्रुवारीमधील ५१.१ टक्क्य़ांपेक्षा गेल्या महिन्याच्या तुलनेत निर्देशांक मोठय़ा फरकाने वाढला आहे. तो यापूर्वीच्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. ५० टक्के ही स्थिर पातळी समजली जाणाऱ्या भारतीय निर्मित उद्योगाची वाढ यंदा या टप्प्यापासून खूपच वर गेल्याने कंपन्या, उद्योगांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्देशांकाला आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या संभाव्य व्याजदर कपातीची साथ मिळाल्यास एकूण नव्या आर्थिक वर्षांतील औद्योगिक प्रवास सुखावह होईल, अशी अपेक्षा सर्वेक्षण जारी करणाऱ्या अहवालाचे अर्थतज्ज्ञ पोलीयाना डी लिमा यांनी व्यक्त केली.