सेन्सेक्स अखेर २७ हजारांखाली

गेल्या चार व्यवहारांतील सेन्सेक्सची घसरण ६३२.६७ अंशांची राहिली आहे.

शुक्रवारी सेन्सेक्स आणखी १८१.३१ अंशाने घसरला.

सेन्सेक्सने सलग चौथ्या दिवशी  घसरणीचा कित्ता गिरविला. गुरुवारी २०१.६२ अंश घसरणीमुळे मुंबई निर्देशांक २६,८३८.१४ वर स्थिरावला. बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार होते. त्यातच अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या ‘जैसे थे’ व्याजदर बैठकीनंतरही बाजारात फारसा उत्साह दिसला नाही. किंबहुना डिसेंबरमध्ये फेडच्या संभाव्य व्याज दरवाढीचे भयसूचक सावट बाजारावर दिसले. परिणामी घसरणीने सेन्सेक्सने १४ ऑक्टोबरनंतरचा सर्वात खालचा तळ गाठला.

गेल्या चार व्यवहारांतील सेन्सेक्सची घसरण ६३२.६७ अंशांची राहिली आहे. सलग चौथ्या ५९.४५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- निफ्टी ८,१११.७५ वर येऊन ठेपला आहे. फेड दरवाढीच्या भयाने गुंतवणूकदारांनी विक्री करत निर्देशांकांमध्ये घसरण नोंदविली. कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही वित्तीय निष्कर्षांचे, तसेच सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशांपर्यंत कमकुवत झाल्याचे सावटही बाजारावर होते.

गुरुवारी सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य घसरले. त्यात भेल, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, कोल इंडिया, स्टेट बँक, आयटीसी, भारती एअरटेल, गेल यांना अधिक फटका बसला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.३९ टक्क्यांसह सार्वजनिक कंपनी निर्देशांक घसरला. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही अध्र्या टक्क्यापर्यंत घसरले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex fall down over 201 point

ताज्या बातम्या