शुक्रवारी सलग दुसरा दिवस भांडवली बाजारासाठी कमाईचा राहिला. दमदार सुरुवातीनंतर दिवस सरताना निर्देशांक केवळ नाममात्र वाढ नोंदवून बंद झाले असले तरी, बाजारात मजबूत कामगिरी असलेल्या समभागांच्या खरेदीला जोर चढत असल्याचे स्पष्टपणे आढळून आले. उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारच्या सकारात्मकतेसह, सरलेला सप्ताह बाजारासाठी चांगला राहिला. सलग चार सप्ताह तुटीचे गेल्यानंतर बाजाराने साप्ताहिक कमाई केली. शुक्रवारचे व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स २६.५७ अंशांच्या वाढीसह २५,८६८ वर तर निफ्टी ५० ने १३.८० अंशांची कमाई करून ७,८५६.५५ या पातळीवर विश्राम घेतला. सकाळच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे २६ हजार आणि ७,९०० या महत्त्वाच्या पातळ्या ओलांडल्या होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2015 रोजी प्रकाशित
निर्देशांक नाममात्र वधारले, खरेदीला मात्र जोर
शुक्रवारी सलग दुसरा दिवस भांडवली बाजारासाठी कमाईचा राहिला.
Written by रत्नाकर पवार

First published on: 21-11-2015 at 06:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex goes up