मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात गुंतवणूकदारांकडून झालेली खरेदी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारात तेजीचे वातावरण होते. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ६०,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळीही गाठल्याचे दिसून आले. सप्ताहअखेरच्या सत्रातील व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०३.०१ अंशांनी वधारून ५९,९५९.८५ पातळीवर बंद झाला. सत्रात सेन्सेक्सने ३७६.३३ अंशांची मजल मारत ६०,१३३.१७ अशी दिवसातील उच्चांकी पातळी नोंदविली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४९.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १७,७८६.८० पातळीवर स्थिरावला.
सेन्सेक्समध्ये मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसव्र्ह, टायटन आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. वाहननिर्मिती क्षेत्रातील अग्रणी मारुतीने सरलेल्या तिमाहीत आकडेवारी जाहीर करताच मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग ४.९५ टक्क्यांनी म्हणजेच ४४८.०५ रुपयांनी वधारून ९,४९४.१० पातळीवर स्थिरावला. समभागाने सत्रात ९,५४८ रुपयांची ५२ आठवडय़ांतील ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. मारुती सुझुकी इंडियाने शुक्रवारी सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात चार पटीने वाढ नोंदवणारी कामगिरी जाहीर केली. दुसरीकडे टेक महिंद्रा, टाटा स्टील, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँकेच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारच्या सत्रात २,८१८.४० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
‘मारुती सुझुकी’चा समभाग तेजीत