श्रीराम ऑटोमाल इंडिया लिमिटेडने (सामिल) कॉर्पोरेशन बँकेसोबत करार करून या वर्षांतील आणखी एक करार केला आहे. प्री-ओन्ड वाहने व उपकरणे यातील आघाडीची सेवा पुरवठादार कंपनी म्हणून, कंपनी बँकेकडील प्री-ओन्ड वाहनांचा साठा कमी करण्यासाठी आपल्याकडील समावेशक बििडग सुविधा देऊ करणार आहे.
बँकेकडील सर्व प्रकारच्या प्री-ओन्ड व्यावसायिक गाड्या, ट्रॅक्टर, बस, कार व एसयूव्ही, तीनचाकी व दुचाकी यांची विक्री होण्यासाठी कंपनी परिपूर्ण उपाय देणार आहे.
या करारानुसार, सामिल आपल्या नियमित भौतिक व ऑनलाइन बििडग कार्यक्रमामार्फत बँकेला वाहनांची विक्री करण्यास मदत करणार आहे. ‘कॉर्पोरेशन बँकेसोबतच्या सहयोगामार्फत, आमच्या ऑनलाइन व भौतिक अशा दोन्ही नियमित कार्यक्रमांमार्फत अधिकाधिक विक्री करण्यासाठी साठवणुकीत वाढ करून आमचा प्री-ओन्ड वाहन व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे’, असे समीर मल्होत्रा (सामिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणाले.
‘कॅमल आर्ट कॉन्टेस्ट’चे विजेते सन्मानित
मुंबई : देशाची अग्रेसर व प्रमुख स्टेशनरी कंपनी, कोकुयो कॅमलिन लिमिटेड (पूर्वी कॅमलिन लिमिटेड)ने जगातील सर्वात मोठी कला स्पर्धा ‘कॅमल आर्ट कॉन्टेस्ट २०१४’ (पूर्वी ‘ऑल इंडिया कॅमल कलर कॉन्टेस्ट – एआयसीसीसी’ म्हणून प्रसिद्ध) च्या निकालाची घोषणा केली. प्रतिष्ठित चित्रपट अभिनेता व रंगभूमी व्यक्तिमत्त्व ओम पुरी यांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या समारंभामध्ये मुलांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले.
ब्रिजस्टोनच्या मुंबईतील दालनाचे उद्घाटन
मुंबई : जगातील क्रमांक एकची टायर आणि रबर उत्पादक कंपनी ब्रिजस्टोनने खारघर, नवी मुंबई येथे नवीन विशेष निवडक दालनाची नुकतीच सुरुवात केली. या विशेष दालनाचे उद्घाटन ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक वैभव सराफ यांनी केले. या दालनाचे उद्दिष्ट विक्रीवर भर देण्यावर राहणार आहे, असा दावा यावेळी करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2015 रोजी प्रकाशित
श्रीराम ऑटोमॉलचा कॉर्पोरेशन बँकेसोबत करार
श्रीराम ऑटोमाल इंडिया लिमिटेडने (सामिल) कॉर्पोरेशन बँकेसोबत करार करून या वर्षांतील आणखी एक करार केला आहे.
First published on: 03-03-2015 at 07:28 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shriram automall signs an agreement with corporation bank