अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत आज सादर केला. आपल्या दोन तासांच्या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या महागणार याकडे सर्व सामान्यांचे लक्ष लागून होते.
महागलेल्या गोष्टी:

* खोबरेल तेल
* दुचाकी आणि तीन चाकी वाहने
* लॉटरी
* पेट्रोल, डिझेल, हिरे, दारु
* चहा
* मार्बल, ग्रॅनाईट, चहा

स्वस्त झालेल्या गोष्टी:
* वापरलेली वाहने
* बेदाणे आणि मनुका
* बॅटरी, सौरऊर्जेवरील वाहने
* एलईडी बल्ब, ट्युब
* गणितासाठी लागणारे साहित्य
* संरक्षण तार
* स्तन कर्करोगासाठी वापरण्यात येणारी मॅमोग्राफी यंत्रणा
* इंजेक्शनमध्ये वापरण्यात येणारे निर्जंतुकीकरणाचे पाणी