भारतीय भांडवली बाजारांच्या भाऊगर्दीत आता आणखी एक स्पर्धक येऊन ठेपला आहे. चलन तसेच वस्तू वायदे बाजारात क्रमांक एकचा असणाऱ्या एमसीएक्स-स्टॉक एक्स्चेंज अर्थात एमसीएक्स-एसएक्सनेही उडी घेतली आहे. यासाठीची तयारी दोन वर्षांपूर्वी सुरू केल्यानंतर कंपनीच्या नव्या भांडवली बाजाराचे औपचारिक उद्घाटन शनिवारी झाले आणि आजपासून प्रत्यक्षात व्यवहारही सुरू झाले.
बाजाराने विकसित केलेला एसएक्स-४० निर्देशांक आणि त्यातील समाविष्ट कंपनी-वायदा समभाग (इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह) यांच्या व्यवहाराचे आकडे सोमवारी पहिल्यांदा झळकले. पहिल्या दिवशी या नव्या भांडवली बाजाराने १२.५३ कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली. तर १९८ सदस्यांनी व्यवहार केले. त्यातही इक्विटीमध्ये १९८ तर फ्युचर अॅण्ड ऑप्शन्समध्ये ५८ सदस्यांनी व्यवहार केले.
४० लार्ज कॅप आणि सर्वाधिक तरल समभागांचा समावेश असलेल्या या निर्देशांकाचे आधारमूल्य मार्च २०१० च्या धर्तीवर १०,००० अंश असे निश्चित करण्यात आले आहे. शुक्रवारअखेर ४०५ सदस्य या भांडवली बाजाराचे सदस्य होते. ‘एसएक्स४०’च्या व्यासपीठावर सध्या १,११६ कंपन्यांचे समभाग उपलब्ध आहेत. तर राष्ट्रीय शेअर बाजारात १,६६५ आणि मुंबई शेअर बाजारात ५,१९१ कंपन्या सूचीबद्ध आहेत.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त ५० तर मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’मध्ये ५० कंपन्यांचा समावेश आहे. एमसीएक्स-एसएक्सच्या प्रमुख निर्देशांकात ४० कंपन्या असतील. या निर्देशांकात आयटीसी ही सर्वाधिक ९.४ भारांक असलेली कंपनी असून पहिल्या १० कंपन्यांच्या भारांकाची बेरीज ५७.४ आहे. या निर्देशांकात आíथक सेवा (२२%) सर्वाधिक भारांक असून त्या खालोखाल ग्राहकोपयोगी वस्तू (१८.२%) औद्योगिक उत्पादने व तेल आणि वायू या दोन्ही क्षेत्रांना (१४.८%) तर माहिती तंत्रज्ञान (१४.२%), आरोग्य (५.१%), इतर उत्पादने (४.७%) इतर सेवा (३.१%) दूरसंचार (२.४%) तर ग्राहक सेवा (०.७%) असे भारांक आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2013 रोजी प्रकाशित
तीस-चाळीस-पन्नास..
भारतीय भांडवली बाजारांच्या भाऊगर्दीत आता आणखी एक स्पर्धक येऊन ठेपला आहे. चलन तसेच वस्तू वायदे बाजारात क्रमांक एकचा असणाऱ्या एमसीएक्स-स्टॉक एक्स्चेंज अर्थात एमसीएक्स-एसएक्सनेही उडी घेतली आहे.
First published on: 12-02-2013 at 03:33 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirty fourty fifty