बोरिवली पूर्व येथे आपल्या पाचव्या सुपर स्पेशालिटी नेत्रनिगा रुग्णालयाचे वासन आय केअरकडून बुधवारी करण्यात आले. परिपूर्ण नेत्रविषयक उपचार व शस्त्रक्रियेच्या सुविधा आणि आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सामग्रीने सुसज्ज या रुग्णालयाचे उद्घाटन स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले. पश्चिम द्रुतगती मार्गावर मागाठाणे बस स्थानकाजवळ अॅम्ब्रोशिया इमारतीत हे रुग्णालय आहे. वासन आय केअरचा देशात २०० रुग्णालयांची साखळी तयार करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन असून, यातून महाराष्ट्रात अन्य भागांतही नवीन रुग्णालये सुरू केली जाणार असल्याचे वासन हेल्थकेअर समूहाचे अध्यक्ष व कार्यकारी व्यवस्थापक डॉ. ए. एम. अरुण यांनी सांगितले.